Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरच्या उपकारागृहातून चार कैदी फरार

चारही आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके मागावर

संगमनेर ः खुनाचा प्रयत्न, खून, पोक्सो, बलात्कार प्रकरणातील चार कैदी शहर पोलीस ठाण्यात असलेल्या उपकारागृहाचे गज कापून पसार झाल्याची धक्कादायक घटना

जिल्हाधिकाऱ्यांचे धडक कारवाईमुळे पाथर्डीतील सहा दुकानाला लागले सील
दुषित जल शुद्धीकरण संयंत्राला स्थानिकांचा विरोध
मनपात जगताप समर्थकांनी गुंडगिरी व धुडगूस घातला : काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष काळेंचा आरोप

संगमनेर ः खुनाचा प्रयत्न, खून, पोक्सो, बलात्कार प्रकरणातील चार कैदी शहर पोलीस ठाण्यात असलेल्या उपकारागृहाचे गज कापून पसार झाल्याची धक्कादायक घटना पहाटे घडली आहे. या कोठडीतून आरोपी पळून जाण्याचा हा दुसरा प्रकार आहे. या घटनेमुळे पोलीस आणि तुरुंग प्रशासनाची धावपळ उडाली अजून पळून गेलेल्या चारही आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके त्यांच्या मागावर पाठविण्यात आली.
राहुल देविदास काळे, मच्छिंद्र मनाजी जाधव, अनिल छबु ढोले आणि रमेश रोशन दधेल उर्फ थापा असे कोठडीचे गज कापून पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे सर्वजण संगमनेरच्या उपकारागृहात न्यायालयीन कोठडीत बंदिस्त होते. राहुल काळे याच्यावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून अनिल ढोले याच्यावर पोटच्या मुलीवर बलात्कार, पोक्सो, मच्छिंद्र जाधव याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा तर रमेश दधेल याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. आरोपी कोठडीतून पळून जाण्याचा प्रकार बुधवारी पहाटे समोर आला आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे तहसीलदार धीरज मांजरे आदी अधिकार्‍यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. दरम्यान यासंदर्भात अद्याप पर्यंत पोलिस अधिकार्‍यांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याप्रकरणी उप कारागृहात बंदोबस्तासाठी असलेल्या गार्डवर तातडीने कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील काही पोलीस अधिकारी आणि तुरुंग प्रशासनाच्या आशीर्वादाने कारागृहातील आरोपींना बाहेरचे जेवण, गुटखा, तंबाखू, मोबाईल आदींसह नातेवाईक मित्रमंडळींच्या भेटीगाठी सहजपणे उपलब्ध असतात. यामुळे कोठडीतील आरोपींची मुजोरी वाढून त्यांनी पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना दमदाटी करण्याचे प्रकार देखील यापूर्वी घडले आहे. एवढेच नव्हे तर कोठडीमध्ये पोलिसांच्या उपस्थितीत कायद्यांचे वाढदिवस देखील साजरा झाल्याच्या घटना समोर आली आहे. तीन नंबरच्या कोठडीचे गज कापून या आरोपींनी पलायन केले. आरोपींनी कोठडीचे गज कापण्यासाठी व्हेक्सा ब्लेडचा वापर केल्याचे दिसून येत आहे. शिवाय हे काम एका दिवसाचे नसून गेल्या काही दिवसापासून सातत्याने केले जात होते. याची माहिती कोठडीतील अन्य आरोपींना असून देखील त्यांनी याची वाच्यता केली नाही. तसेच सातत्याने बंदोबस्तावर असलेल्या तत्कालीन गार्डने देखील बारकाईने तपासणी केली नसल्याने आरोपींनी सहजपणे पलायन केल्याचे दिसून येते. तुरुंगाचे गज कापण्यासाठी व्हेक्सा ब्लेड आले कुठून याचा देखील शोध घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे या आरोपींवर पोलीस ठाण्यातील कोणते अधिकारी मेहरबान होते का हे देखील शोधणे गरजेचे आहे.

COMMENTS