वादळ आणि अतिवृष्टीमुळे एकाच कुटूंबातील तिघांसह चौघांचा मृत्यु

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वादळ आणि अतिवृष्टीमुळे एकाच कुटूंबातील तिघांसह चौघांचा मृत्यु

।संगमनेर/प्रतिनिधी।९संगमनेर तालुक्यातील अकलापुर येथील एकाच कुटूंबातील तिघांचा गुरुवारी दि.९ रोजी सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी अतिवृष्टीमुळे चार जणा

छत्रपती शिवराय कल्याणकारी राजे होते – आ.आशुतोष काळे
नितीन गडाख यांना उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार
शालेय पोषण आहार संघटनेचा कोपरगाव तहसीलवर मोर्चा

।संगमनेर/प्रतिनिधी।९संगमनेर तालुक्यातील अकलापुर येथील एकाच कुटूंबातील तिघांचा गुरुवारी दि.९ रोजी सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी अतिवृष्टीमुळे चार जणांचा मृत्यू झाला. मृतात १० वर्षीय बालकाचा समावेश आहे. मालदाड येथे झाड अंगावर पडून अकोले तालुक्यातील महिलेचा मृत्यु झाला आहे. दरम्यान या घटनेला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असून तालुक्यातील नुकसानीची माहीती घेण्याचे काम सुरु होते.विठ्ठल भिमा दुधवडे (वय ८५ वर्षे), होसाबाई भिमा दुधवडे (वय ८० वर्षे), साहिल पिनु दुधवडे (वय १० वर्षे) आणि सुरेखा राजु मधे (वय २८ वर्षे) अशी मृतकांची नांवे आहेत. संगमनेर शहर आणि तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाली. काही भागात गारांचा जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहीती आहे. दरम्यान शासकीय पातळीवर नुकसानीची माहिती घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.तालुक्यातील अकलापुर येथील मुंजेवाडी शिवारात वादळी वारा आणि अतिवृष्टीमुळे घरावरील पत्रे दुरवर उडून गेले. याच दरम्यान घराची भिंत अंगावर पडून घरामधील विठ्ठल भिमा दुधवडे, होसाबाई भिमा दुधवडे आणि साहिल पिनु दुधवडे या तिघांचा मृत्यु झाला तर वनिता पिना दुधवडे (वय ८ वर्षे) व मंदाबाई विठ्ठल दुधवडे (वय ७० वर्षे) या दोन जणांचा जखमीत समावेश आहे. एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यु झाल्याने या परिसरात शोककळा कोसळली आहे. पावसाच्या या तांडवात संपुर्ण कुटूंब उध्वस्त झाले आहे. जखमींची प्रकृतीदेखील चिंताजनक असल्याची माहिती मिळाली. तर दुसऱ्या घटनेत तालुक्यातील मालदाड येथे वादळ सुरु असतांना झाड अंगावर पडून सुरेखा राजु मधे (वय २८ वर्षे, रा. डोंगरगांव, तालुका अकोले) या महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान शहरातदेखील वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे वृक्ष उन्मळुन पडले. तर वीजेचे पोलदेखील वाकले असून महावितरणच्या कार्यालयाच्या लगत असलेले एक मोठे झाड महावितरणच्या रोहीत्रावर पडले आहे. वादळी पाऊसामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला असून हा पुरवठा केव्हा सुरळीत होईल याची उशिरापर्यत निश्चीती नव्हती.

“संगमनेर तालुक्यामध्ये झालेल्या वादळ आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या चार जणांचे मृत्यु झाले आहेत. यात दोन महिलांसह एका बालकाचा समावेश आहे. यासंदर्भातील अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला असून मयत व्यक्तींच्या वारसांना लवकरात लवकर मदत देण्याची दक्षता घेतली जात आहे. तसेच नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठ्यांना देण्यात आले आहे.”-

अमोल निकम, तहसिलदार, संगमनेर

COMMENTS