Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चिखलदर्‍यात कार दरीत कोसळून चौघांचा मृत्यू

अमरावती/प्रतिनिधी : चिखलदरा येथे जात असलेल्या पर्यटकांची कार 200 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चारजण

बसच्या धडकेत 9 जणांचा मृत्यू तर 38 जण जखमी
चालकाचे बस वरील बस नियंत्रण सुटल्याने बस रिक्षाला धडकली
अल्पवयीन मुलाने गाडी चालवत वाहनांना उडवले

अमरावती/प्रतिनिधी : चिखलदरा येथे जात असलेल्या पर्यटकांची कार 200 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चारजण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. हा अपघात परतवाडा ते चिखलदरा मार्गावर मोथा गावानजीक रविवारी सकाळी घडला. काही दिवसांपूर्वी पुण्यातील ताम्हिणी घाटात झालेल्या अपघाताची घटना ताजी असतानाच अमरावती जिल्ह्यात कार दरीत कोसळून चार पर्यटकांचा मृत्यू णाला आहे.
अपघात झाल्यानंतर कारचा चेंदामेंदा झाला असून अन्य चार प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून त्यानंतर स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये रिमझिम पाऊस होत असल्याने तेलंगणातील आदिलाबाद येथून आठ पर्यटक चिखलदर्‍यात आले होते. अमरावती-चिखलदरा मार्गावरून जात असताना भरधाव कार 200 फूट खोल दरीत कोसळली. या घटनेत चार पर्यटकांचा मृत्यू झाला असून अन्य चार लोक जखमी झाल्याची माहिती आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त कार अर्टिगा असून एपी 28 डीडब्ल्यू 2119 असा कारचा नंबर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

COMMENTS