Homeताज्या बातम्यादेश

द्वारकामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

गांधीनगर ः गुजरातच्या द्वारका परिसरातील एका घराला अचानक आग लागली. घराला आग लागली तेव्हा कुटुंबातील सदस्य घरामध्येच होते. आगीने रौद्ररुप धारण केल्

पोलिसानं सास-यावर गोळ्या झाडून केली हत्या l DAINIK LOKMNTHAN —————
युक्रेनमध्ये गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू | LOKNews24
चंद्रकांत पाटलांच्या प्रतिमेला मारले जोडे LOKNews24

गांधीनगर ः गुजरातच्या द्वारका परिसरातील एका घराला अचानक आग लागली. घराला आग लागली तेव्हा कुटुंबातील सदस्य घरामध्येच होते. आगीने रौद्ररुप धारण केल्याने कुटुंबीयांचा जीव गुदमरू लागला. या घटनेत एका लहान बालकासह 4 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाची वाहने देखील घटनास्थळी दाखल झाली. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

COMMENTS