Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपघातात एकाच कुटुबांतील चौघांचा मृत्यू

पुणे/प्रतिनिधी ः पुणे अहमदनगर रस्त्यावरील शिरुर तालुक्यातील कारेगाव जवळ फलके मळ्यानजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर मागच्या बाजूने म

रॅगिंगला कंटाळून मेडिकलच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
श्रीगोंदा शहरात एक हजार झाडे लावण्याचा उपक्रम
अमिताभ बच्चन शुटिंग दरम्यान जखमी

पुणे/प्रतिनिधी ः पुणे अहमदनगर रस्त्यावरील शिरुर तालुक्यातील कारेगाव जवळ फलके मळ्यानजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर मागच्या बाजूने मोटार आदळून झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील चौघे ठार झाले. मृतांत चार वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास झालेल्या या अपघातांत मोटारचालक गंभीर जखमी झाला

सुदाम शंकर भोंडवे (वय 66), सिंधुताई सुदाम भोंडवे (वय 60), कार्तिकी अश्‍विन भोंडवे (वय 32) व आनंदी अश्‍वीन भोंडवे (वय 4 वर्षे, सर्व रा. डोमरी, ता. पाटोदा, जि. बीड) अशी या अपघातातील मृतांची नावे असून, अश्‍विन सुदाम भोंडवे (वय 35) हे या अपघातात जखमी झाले. ते मोटार चालवित होते. त्यांच्यावर कारेगाव मधील खासगी रूग्णालयात उपचार चालू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, अश्‍विन भोंडवे यांच्या चाकण येथील मेहुण्याला लग्नासाठी पाहुणे बघायला येणार असल्याने ते वडील सुदाम भोंडवे, आई सिंधुताई, पत्नी कार्तिकी व मुलगी आनंदी यांच्यासह इंडिका मोटारीतून (क्र. एमएच 12 ईएम 2978) चाकणकडे चालले असतांना हा अपघात झाला.

COMMENTS