Homeताज्या बातम्यादेश

शाळेतील गोळीबारात चौघांचा मृत्यू

न्यूयार्क : अमेरिकेमध्ये विद्यार्थ्यांच्या हातात बंदूक आढळून येण्याचे प्रकार सातत्याने वाढत असून, अमेरिकेतील जॉर्जिया येथील अपलाची हायस्कूलमध्ये

देवळाली प्रवरात ’वीरो को वंदन’ कार्यक्रमाचे आयोजन
कोरोना आपत्ती आणि गृहमंत्रीपदाचा देशमुख यांचा राजीनामा l Lok News24
रश्मिकाकडून पुष्पा 2 सेटवरचा फोटो शेअर

न्यूयार्क : अमेरिकेमध्ये विद्यार्थ्यांच्या हातात बंदूक आढळून येण्याचे प्रकार सातत्याने वाढत असून, अमेरिकेतील जॉर्जिया येथील अपलाची हायस्कूलमध्ये अल्पवयीन पोरोने केलेल्या गोळीबारात दोन शिक्षकांसह चौघांचा अंत झाला. या घटनेत 9 जण जखमी झाले. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका 14 वर्षीय मुलाला अटक केली आहे, जो तेथील विद्यार्थी आहे. राजधानी अटलांटापासून 70 किमी अंतरावर असलेल्या विंडर शहरातील एका शाळेत ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता हल्लेखोराने आत्मसमर्पण केले आणि जमिनीवर पडून राहिला.

COMMENTS