गेवराई प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील गढी, कोळगाव, बोरगाव, बेलगाव या चार 33 के.व्ही. उपकेंद्रांना शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. मागील अनेक दिवस
गेवराई प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील गढी, कोळगाव, बोरगाव, बेलगाव या चार 33 के.व्ही. उपकेंद्रांना शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून या भागात वारंवार विज खंडीत होणे, कमी दाबाने विज पुरवठा होणे यांसारख्या प्रकारामुळे विज ग्राहक व शेतकरी त्रस्त झाले होते. ग्रामस्थांच्या मागणीनुसार अमरसिंह पंडित यांनी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून गेवराई तालुक्यातील प्रस्तावित चार 33 के.व्ही.उपकेंद्रांना अखेर मंजुरी मिळाली आहे.
गेवराई तालुक्यातील विजेच्या प्रश्ना बाबत सातत्याने जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी प्राधान्याने पाठपुरावा केलेला आहे. गोदाकाठावर नवीन 11 के.व्ही. लाईन करण्यापासून ते नवीन 33 के.व्ही. उपकेंद्राच्या निर्मिती संदर्भात शासनाकडे प्रयत्न केले आहेत. बोरगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकी दरम्यान त्यांनी ग्रामस्थांना 33 के.व्ही. उपकेंद्राचे आश्वासन दिले होते. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे गेवराई तालुक्यातील गढी, कोळगाव, बोरगाव, बेलगाव या चार 33 के.व्ही. केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. चारही ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचाराच्या असल्यामुळे 33 के.व्ही उपकेंद्रांना लागणारी जागा तात्काळ उपलब्ध करून उपकेंद्राचे काम लवकरात लवकर सुरु करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया अमरसिंह पंडित यांनी दिली. कोळगाव येथे यापूर्वी 33 के.व्ही उपकेंद्र मंजुर झाले होते, मात्र केवळ जागा उपलब्ध न झाल्यामुळे उपकेंद्राचे काम होवू शकले नाही. त्यामुळे यावेळी कोळगाव येथील उपकेंद्राच्या कामासाठी विद्यमान सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी आग्रही भुमिका घेतली असून लवकरच ग्रामपंचायतीकडून जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करणार असल्याचेही माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी सांगितले. सातत्याने विजेच्या प्रश्नामुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांना विशेषतः शेतकर्यांना या नवीन उपकेंद्रांच्या मंजरीमुळे दिलासा मिळाला असून त्यांनी अमरसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले आहेत.
COMMENTS