Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांच निधन

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू, पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या विद्यमान संचालिका डॉ. स्नेहलता देशमुख यांच आजारपणामुळे सोमवारी सकाळी

महाविकास आघाडीच्या काळात असे काहीही घडले नाही –  माजी गृहमंत्री दिलीप वळसे 
धावत्या विदर्भ एक्स्प्रेस समोर उडी घेऊन युगुलाची आत्महत्या
एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहाणार नाही : मंत्री धनंजय मुंडे

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू, पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या विद्यमान संचालिका डॉ. स्नेहलता देशमुख यांच आजारपणामुळे सोमवारी सकाळी निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणार्‍या शिक्षिका म्हणून त्यांची ओळख होती. ऐवढेच नाही तर, मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू असतांना त्यांनी शिक्षण पद्धतीतले नवे बदल यामुळे त्या विशेष चर्चेत राहिल्या. त्यांनी कुलगुरू म्हणून अनेक महत्वाचे निर्णय घेतले.
डॉ. स्नेहलता देशमुख या लहान असल्यापासून हुशार होत्या. त्यांनी त्यांचे शिक्षण जिद्दीने पुर केले. देशमुख या रांगोळी, एम्ब्रॉयडरी, ड्रॉईंग-पेन्टिंग गाणी सारख्या अनेक कलांमध्ये पारंगत होत्या. स्नेहलता देशमुख यांचे वडील डॉ. श्रीकृष्ण वासुदेव जोगळेकर हे प्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांनी शस्त्रक्रियेत पदवी मिळवली होती. त्यांनी मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय व के.ई.एम. रुग्णालय येथे अधिष्ठाता म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. स्नेहलता देशमुख या देखील त्यांच्या वडिलांप्रमाणे डॉक्टर झाल्या. डॉ. स्नेहलता देशमुख यांनी त्यांच शालेय शिक्षण संपवून महाविद्यालयीन शिक्षण दादर येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या मुलींच्या शाळेतून घेतले. यानंतर त्यांनी रुईया महाविद्यालयातून पुढील शिक्षण घेतले. त्या हुशार असल्याने त्यांना जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. एम.बी.बी.एस.ला त्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी सर्वविषयात प्रथम आल्या. यंतनर त्यांनी शस्त्रक्रिया या विषयाच्या शिक्षणासाठी टाटा रुग्णालयात प्रवेश मिळण्यासाठी अर्ज केला. पण, त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. त्यांनी प्रयत्न करून देखील त्यांना प्रवेश मिळाला नाही. यानंतर त्यांनी जी.एस.मध्ये अर्भकांवरची शस्त्रक्रिया या विषयात शिक्षण घेण्याचा निर्णय घेत प्रवेश घेतला. यात एक प्रसिद्ध शल्यविशारद म्हणून त्यांनी ओळख मिळवली.

COMMENTS