Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

अहमदनगर प्रतिनिधी - पाथर्डी तालुक्यातील अकोले गावातील रहिवासी असलेले माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे (वय 85) शुक्रवारी सकाळी साडेदहा

महावितरणची डिजीटलायजेशनकडे वाटचाल
चंद्रदर्शन झाल्याने आजपासून रमजान उपवासांना प्रारंभ
कोंभळीत अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात

अहमदनगर प्रतिनिधी – पाथर्डी तालुक्यातील अकोले गावातील रहिवासी असलेले माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे (वय 85) शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस वकील प्रतापराव ढाकणे हे त्यांचे पुत्र होत. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. नगरमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या शनिवारी दुपारी एक वाजेपर्यंत पाथर्डीतील हिंद वसतिगृह येथे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. पाथर्डीतील पागोरी पिंपळगाव येथे त्यांच्या पार्थिवावर दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती प्रतापराव ढाकणे यांनी समाज माध्यमांवर पोस्ट शेअर करत दिली आहे. महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलातर्फे नवव्या लोकसभेवर निवडून गेले होते. गोवा मुक्तिसंग्रामात त्यांनी भाग घेतला होता. चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ऊर्जामंत्री होते. बबनरावांचा जन्म 10 नोव्हेंबर 1937 अकोले (ता. पाथर्डी) या गावी झाला. जिल्हा लोकल बोर्डामार्फत चालविल्या जाणाऱ्या प्राथमिक शाळेत बबनरावांचे चौथीपर्यंतचे शिक्षण अकोले येथे माध्यमिक शिक्षण आठवीपर्यंतचे तिलोक जैन शाळेत झाले.

COMMENTS