श्रीगोंदा : नागपूर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने दिल्ली संघाचा ७-२ असा दणदणीत पराभव करत सुवर्णपदक पटकावले. या विजयी संघाचे नेतृत्व करत नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूलची माजी विद्यार्थिनी श्रुतिका नितीन वाबळे हिने ‘सुवर्णकन्या’ ठरण्याचा मान मिळवला. श्रुतिकाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूल येथे तिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना श्रुतिकाने सांगितले की, शालेय जीवनात असताना खेळाची आवड जोपासण्यासाठी मिळालेले प्रोत्साहन व क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच तिचा भक्कम पाया तयार झाला आणि हे यश संपादन करता आले. “खेळासोबतच अभ्यासालाही तितकेच महत्त्व आहे,” असेही तिने विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितले. दरम्यान, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांना ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय प्रगतीची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, विश्वस्त अनुराधा नागवडे, निरीक्षक एस. पी. गोलांडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांनी श्रुतिका व मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांचे अभिनंदन केले.

श्रीगोंदा : नागपूर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने दिल्ली संघाचा ७-२ असा दणदणीत पराभव करत सुवर्णपदक पटकावले. या विजयी संघाचे नेतृत्व करत नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूलची माजी विद्यार्थिनी श्रुतिका नितीन वाबळे हिने ‘सुवर्णकन्या’ ठरण्याचा मान मिळवला.
श्रुतिकाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूल येथे तिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना श्रुतिकाने सांगितले की, शालेय जीवनात असताना खेळाची आवड जोपासण्यासाठी मिळालेले प्रोत्साहन व क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच तिचा भक्कम पाया तयार झाला आणि हे यश संपादन करता आले. “खेळासोबतच अभ्यासालाही तितकेच महत्त्व आहे,” असेही तिने विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितले.
दरम्यान, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांना ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय प्रगतीची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, विश्वस्त अनुराधा नागवडे, निरीक्षक एस. पी. गोलांडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांनी श्रुतिका व मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांचे अभिनंदन केले.

COMMENTS