Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा भारत राष्ट्रीय समिती या पक्षात जाहीर प्रवेश

मुंबई प्रतिनिधी - दिनांक ४ मार्च 2023 रोजी, भटके विमुक्त समाजाचे राष्ट्रीय नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी तेलंगणाचे लोकप्रिय मुख्यमंत्

डेझी शाहची मराठीत धमाकेदार एण्ट्री
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या घरावर जमावाचा हल्ला
किरीट सोमैया यांची माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका 

मुंबई प्रतिनिधी – दिनांक ४ मार्च 2023 रोजी, भटके विमुक्त समाजाचे राष्ट्रीय नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी तेलंगणाचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला, याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, आम आदमी पार्टी ही देशातील फार चांगली पार्टी आहे सर्वसामान्यांचे प्रश्न संदर्भात त्यांचं चांगलं काम आहे.  परंतु त्या ही पेक्षा भारत राष्ट्र समिती बी. आर. एस. ही पार्टी अधिक चांगले असून, ती गोरगरीब, दलित आणि खास करून शेतकऱ्याची किसान पार्टी आहे. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.  असे मत राठोड यांनी व्यक्त केले. तसेच गोरगरीब आणि शेतकरी यांच्या संदर्भात अनेक चांगल्या योजना या पक्षाकडे आहे आणि या सर्व बाबींचा विचार करून मी या पक्षाकडे आकर्षित झालो. राष्ट्रीय पातळीवर शेतकन्यांचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्न संदर्भात जाण असणारा एकमेव नेते माननीय के चंद्रशेखर राव हे आहेत असा असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांना वीज मोफत ३. शेतकऱ्याचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये विमा योजना, ४. मुलगी जन्माला आल्यास के, सी. आर. किट तसेच रुपये १३०००, आर्थिक मदत आणि लासाठी एक लाख 16 हजार रुपये आर्थिक मदत, ४. वस्ती दवाखाना, दलित बंधू योजनेत दहा लाख रुपये उद्योगधंद्यासाठी मदत देण्याची योजना, इत्यादी योजना के सी आर सरकार राबवत आहेत. याप्रसंगी आमदार बालका सुमन, राज्यसभा सदस्य जोगिन पल्ली, संतोष कुमार, हिमांशू तिवारी, आमदार जोग रामन्ना, माजी खासदार नागेश घोडाम आदिलाबाद माजी आमदार दीपक आत्राम, माननीय मंत्री सत्यवती राठोड, आमदार रेखा नायक, माणिक कदम, प्रदेश किसान सेल (महाराष्ट्र) अमृतलाल चव्हाण बी. आर. एस. नेते तथा असंखा कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS