पुणे ः पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे वयाच्या 78 व्या वर्षी पहाटे अल्प आजाराने दुखद निधन झाले.

पुणे ः पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे वयाच्या 78 व्या वर्षी पहाटे अल्प आजाराने दुखद निधन झाले. विश्वास गांगुर्डे यांच्या पश्चात पत्नी, मुली आणि जावई असा परिवार असून सकाळी 10 वाजता घरी आण्यात आले आहे आणि दुपारी 12 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशान भूमी येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले. दरम्यान गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. त्यांच्यावर सात दिवसापासून रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. गांगुर्डे यांचा राजकीय प्रवास पुणे मनपाचे नगरसेवक ते आमदार असा राहिला आहे. त्यांनी पुणे शहरात भारतीय जनता पक्षाचे काम तळागाळापर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले होते. रुपी बॅकेचे ते संचालक होते. पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून ते निवडून आले. 1999 मध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघातून ते आमदार झाले होते.
COMMENTS