Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपला शिराळ्यात खिंडार माजी मंत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश; खा. शरद पवार यांच्याशी चर्चेत नाईक यांचा राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब

मुबंई : रणधिर नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, मानसिंगराव नाईक, खा. शरद पवार यांच्याशी चर्चा करताना. शिराळा / प्रतिनिधी : शिवाजीराव नाईक यांनी रा

कोणत्याही राजकीय पक्षाला गावात फिरकू देणार नाही; शेतकरी संघटनेचा निर्धार
महिला वकिल यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न
जिल्हा कोषागार अधिकारी धनाजी शिंदे यांना मुंबईत उपसंचालक पदी पदोन्नती

शिराळा / प्रतिनिधी : शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची बुधवार,दि. 2 मार्च रोजी माजी मंत्री नाईक यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांची मुंबई येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे भेट घेतली.
माजी राज्यमंत्री, ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईक यांचा बहुचर्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील प्रवेश त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने निश्‍चित झाला. खा. पवार म्हणाले, आपण सगळे पूर्वी एकाच विचाराने काम केले आहे. आता पुन्हा एकत्र येऊन अधिक जोमाने काम करुया. आज शिवजीरावांनी वाढदिवसा दिवशी राष्ट्रवादी पक्षात येण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. वाढदिवसानिमित्त तुम्हाला शुभेच्छा देतो. यावेळी झालेल्या चर्चेनुसार खा. पवार व इतर मान्यवरच्या उपस्थित 2 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या मुहर्तावर शिराळ्यात शिवछत्रपती विद्यालयाच्या पटांगणावर भव्य शेतकरी मेळाव्यात पक्ष प्रवेश होईल.
शिवाजीराव तुम्ही पूर्वी राष्ट्रवादीचे होता. यापुढे सर्वांनी मिळून पक्ष वाढवा. त्या वेळी खा. शरद पवार यांचेबरोबर झालेल्या चर्चेत नाईक यांचा राष्ट्रवादीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला. गेल्या महिनाभरापासून नाईक यांचा राष्ट्रवादीमध्ये होणारा प्रवेश या चर्चेवर आता पडदा पडला आहे.
शिवाजीराव नाईक हे गेली दोन वर्षे भाजपवर नाराज होते. भाजपने सन 2014 पासून त्यांना मंत्रि पदासाठी डावलले. त्याचबरोबर अडचणीत आलेल्या संस्थांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. अडचणीत आलेल्या संस्था पुनर्जिवित करण्यासाठी त्यांची आणि त्यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक व सत्यजित नाईक यांची धडपड सुरु होती. शेकडो हातांचा रोजगार संस्था बंद असल्यामुळे थांबला होता. अखेर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी मानसिंगराव नाईक यांची वर्णी लागली आणि यातून शिवाजीराव नाईक यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला चालना मिळाली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष व आ. मानसिंगराव नाईक यांनी बेरजेचे राजकारण करत पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीराव नाईक यांना राष्ट्रवादीमध्ये घेऊन आपला राजकीय पाया आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आ. मानसिंगराव नाईक, यशवंत उद्योग समुहाचे चेअरमन रणधीर नाईक, सत्यजीत नाईक, अभिजीत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

पश्‍चिम महाराष्ट्रातील शिराळा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलेले शिवाजीराव नाईक हे राष्ट्रवादी जाणार असल्याने हा भाजपला मोठा धक्का आहे. आपण एकाच विचाराचे आहोत यापुढे सर्वसामान्य जनतेसाठी मतदार संघात सर्वत्र राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली एकत्र काम करु. त्यानुसार यापुढे आम्ही पवार यांच्या नेतृवाखाली काम करणार आहोत. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातुन करु.
माजी राज्य मंत्री शिवाजीराव नाईक


COMMENTS