Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन

अहिल्यानगर : माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे शुक्रवारी निधन झाले. तब्बल सात वेळा आमदार राहिलेल्या पिचड यांचे वयाच्या 84 व्या वर

एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये जागृती सप्ताहाचा समारोप
वेस-सोयगाव तलावाच्या 9.98 कोटींच्या कामास मान्यता
संगमनेरात महिलांसाठी पाच दिवसीय योगा शिबीर

अहिल्यानगर : माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे शुक्रवारी निधन झाले. तब्बल सात वेळा आमदार राहिलेल्या पिचड यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. पिचड यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी नाशिकच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. पिचड यांच्या निधनामुळे राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना भाजपच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे. ते राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री होते.
मधुकर पिचड यांचा जन्म 1 जून 1941 साली झाला. त्यांचे मूळ गाव हे अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर हे आहे. त्यांचे वडील शिक्षक होते. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी आपले बीए एलएलबी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी तिथूनच राजकारणाला सुरुवात केली. ते 1972 ला अकोले पंचायत समितीवर सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर 1972 ते 1980 पर्यंत ते पंचायत समितीचे सभापती होते. 1980 पासून ते 2009 पर्यंत ते सलग सातवेळा आमदार म्हणून निवडून आले. 1995 ते जुलै 1999 या काळात त्यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाची धुरा देखील सांभाळली. मधुकर पिचड यांनी 1961मध्ये अमृत सागर दूध सहकारी संस्थेची तर 1993 मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. पिचड यांचा जन्म 1 जून 1941 रोजी राजूर येथे झाला. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथून बीए एलएलबीचे शिक्षण घेतले. विद्यार्थी असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1972 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1972 सालीच ते पंचायत समिती अध्यक्ष झाले. त्यांनी 1980 पर्यंत अध्यक्ष म्हणून काम केले. मधुकर पिचड यांच्या राजकीय प्रवासाला काँग्रेसमधून सुरुवात झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना झाल्यानंतर ते शरद पवार यांच्यासोबत होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. त्यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघातून पुत्र वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून निवडून आणले. मधुकर पिचड यांनी 2019 ला आपल्या मुलासह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी वैभव पिचड यांचा भाजपच्या तिकीटावर पराभव झाला. मधुकर पिचड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत आदिवासी विकास, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण, प्रवास विकास, पशु, संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी पार पाडली होती.

COMMENTS