Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मंत्री डॉ. दीपक सावंत कार अपघातात जखमी

पालघर/प्रतिनिधी ः माजी मंत्री डॉ. दीपक सावंत हे शुक्रवारी सकाळी पालघरच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या संदर्भात अधिकार्‍यांशी चर्चा

’अनलॉक’नंतर बाजारात पसरले नवचैतन्य
सार्वजनिक मंडळांना खुशखबर ! शिवजयंती, आंबेडकर जयंतीला मंडप शुल्क माफी 
संभाजीनगरमध्ये बिबट्याची दहशत

पालघर/प्रतिनिधी ः माजी मंत्री डॉ. दीपक सावंत हे शुक्रवारी सकाळी पालघरच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या संदर्भात अधिकार्‍यांशी चर्चा जात होते. पालघरच्या दिशेनं जात असताना पावणे बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावर काशी मिरा परिसरातील सगणाई नाका इथे दीपक सावंत यांच्या कारला एका डंपरने मागच्या बाजूने धडक दिली. यात सावंत हे जखमी झाले. त्यांच्या पाठीला व मानेला दुखापत झाली आहे. ट्रकच्या धडकेत त्यांच्या कारचंही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. त्यानंतर सावंत हे स्वतः रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोहोचले.

COMMENTS