Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पथदिवे बसवण्यासाठी सामग्री उपलब्ध करून देण्यासाठी माजी नगरसेवक प्रसाद आव्हाड यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

पाथर्डी प्रतिनिधी - शहरातील साईनाथ नगर,फुलेनगर,विद्या कॉलनी, भगवाननगर,शंकरनगर,मेहेरटेकडी,नाथनगर,आसरा नगर,शिवशक्ती नगर,एडके कॉलनी,माणिकदाँडी र

सर्वाधिक दूध पुरवठा करणार्‍या संस्था व कृत्रिमरेतकांचा गौरव :परजणे
आव्हाड महाविद्यालयाच्या महिला खेळाडूंचे राज्यस्तरीय वेटलिफ्टींग यश
जामखेडमध्ये डॉक्टर असोसिएशनकडून कोलकाता घटनेचा निषेध

पाथर्डी प्रतिनिधी – शहरातील साईनाथ नगर,फुलेनगर,विद्या कॉलनी, भगवाननगर,शंकरनगर,मेहेरटेकडी,नाथनगर,आसरा नगर,शिवशक्ती नगर,एडके कॉलनी,माणिकदाँडी रस्ता, धान्य गोडाऊन येथे पथदिवे बसवण्यासाठी आवश्यक साहित्य ठेकेदाराला उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी माजी नगरसेवक प्रसाद आव्हाड यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे गुरुवारी निवेदनाद्वारे केली आहे.

     त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साईनाथ नगर,फुलेनगर,विद्या कॉलनी,भगवाननगर, शंकरनगर,मेहेरटेकडी,नाथनगर,आसरानगर, शिवशक्तीनगर,एडके कॉलनी,माणिकदाँडी रस्ता आणि धान्य गोडाऊन आदी ठिकाणी पथदिवे देखभाल दुरुस्तीची कामे अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. ठेकेदार आवश्यक सामग्री अभावी काम करण्यासाठी समर्थ नाही.तरी पहिल्या टप्यात लाईट २५ वॅट,सिमेंट पोल क्लॅम्प्स,लोखंडी पोल क्लॅम्प्स,वायर बंडल या सामग्रीची मागणी केली आहे.

COMMENTS