Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कराड पालिकेच्या अधिकारी-कर्मचार्‍यांचा सत्कार

कराड / प्रतिनिधी : राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आयोजित स्पर्धेत कराड नगरपरिषदेने राज्यातील नगरपरिषद गटात पहिला क्रमांक पटकावला. सु

पाठीत खंजीर खुपसण्याचे शिवाजीराव नाईक यांचे काम : राहुल महाडीक
जमिन खरेदीप्रकरणी भाजप आमदार जयकुमार गोरेविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
पाचगणीच्या भुरळ घालणार्‍या नैसर्गिक सौंदर्यात सेल्फी पॉइंटची भर; पर्यटकांची तुफान गर्दी

कराड / प्रतिनिधी : राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आयोजित स्पर्धेत कराड नगरपरिषदेने राज्यातील नगरपरिषद गटात पहिला क्रमांक पटकावला. सुमारे 5 कोटी रुपयांचे बक्षीस पटकावले. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हे बक्षीस वितरण करण्यात आले. यापुरस्कार बद्दल कराड दक्षिणचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके व पालिकेच्या कर्मचार्‍यांचा सत्कार करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी इंद्रजीत चव्हाण, जावेद शेख यावेळी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नि व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेत गतवर्षी नगरपालिकेने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला होता. यावर्षी आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा करत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. यासाठी कराड नगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांचे प्रामाणिक प्रयत्नांना यश आले आहे. त्यांना साथ देणार्‍या कराड नगरीच्या सर्व नागरिकांचा मोलाचा वाटा आहे. यामुळेच पालिकेला पहिला क्रमांक पटकविता आला. यापुढेही पालिकेने आपली कामगिरी अधिक कार्यक्षम ठेवावी, यासाठी अधिकाधिक विकास निधी देण्यास मी प्रयत्नशील राहीन.

COMMENTS