मडके विकत असतांना लातूर महापालिकेची दंडेलशाही सुरूलातूर : शहरातील गुळ मार्केट परिसरात मडकी विक्रीस बसलेल्या कुंभार समाजातील विक्रेत्यांकडून लातूर

मडके विकत असतांना लातूर महापालिकेची दंडेलशाही सुरू
लातूर : शहरातील गुळ मार्केट परिसरात मडकी विक्रीस बसलेल्या कुंभार समाजातील विक्रेत्यांकडून लातूर शहर महानगरपालिकेकडून प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड जबरदस्तीने वसूल केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण दावणकर यांनी संबंधित ठिकाणी भेट देत कुंभार बांधवांशी चर्चा केली.
यावेळी उपस्थित विक्रेत्यांनी सक्तीच्या दंड वसुलीबाबत नाराजी व्यक्त केली. दावणकर यांनी कोणत्याही परिस्थितीत अन्यायकारक दंड भरू नये, तसेच समाज एकजुटीने उभा राहील, असे आश्वासन दिले. या प्रश्नावर यापूर्वीही लातूर शहराचे आमदार यांना अनेक वेळा निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुढील काळात अशा प्रकारची सक्ती सुरूच राहिल्यास महानगरपालिकेविरोधात ‘मडकी फोड’ आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी महानगरपालिकेची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. या वेळी वर्षा कुंभार, शितल राम कुंभार, राधिका बालाजी कुंभार, ऋषिकेश राम कुंभार, वंदना लक्ष्मण कुंभार, शुभम सतीश कुंभार, सतीश कुंभार, पार्वती भागवत राजे, जनाबाई शिवाजी कुंभार, शुभम परदेशी, गोपाळ नामदेव कुंभार, सुमनबाई भास्कर कुंभार, गेंदाबाई, तानाजी कुंभार यांच्यासह अनेक कुंभार बांधव उपस्थित होते.

COMMENTS