Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यावर चारा टंचाईचे सावट कायम

मुंबई ः राज्यात काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असल्यामुळे काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र राज्यात पाणी टंचाईचे संकट तीव्र असून अने

रोबोटने घेतला कर्मचाऱ्याचा जीव
समृद्धी नव्हे मृत्यूचा महामार्ग
त्र्यंबकेश्‍वरला पंगतीतील भेदाला मूठमाती

मुंबई ः राज्यात काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असल्यामुळे काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र राज्यात पाणी टंचाईचे संकट तीव्र असून अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू असला तरी, अनेक ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र असतांना आता राज्यात चारा टंचाईचे सावट कायम असल्याचे दिसून येत आहे. कारण राज्यात 2 महिने पुरेल एवढा चारा उपलब्ध असून चारा डेपो सुरू करण्याची शासनाची तयारी असल्याचं दुग्ध आणि पशु संवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे.
यासंदर्भात बोलतांना मंत्री विखे म्हणाले की, येणार्‍या काळात चार्‍याची टंचाई निर्माण होईल हा विचार करूनच आपण अ‍ॅडव्हान्स प्लॅनिंग केले आहे. आज राज्यभरात दोन महिने पुरेल इतका चारा उपलब्ध. जर चारा डेपो सुरु करावे लागले तर चारा उपलब्ध करून देण्याची शासनाची तयारी आहे. चारा उत्पादनासाठी आपण शेतकर्‍यांना चांगला भाव देतो. त्यामुळे यंदा उत्पन्न चांगले, जिथे पाण्याची उपलब्धता चांगली आहे. तिथल्या शेतकर्‍यांना आपण बियाणे मोफत देतो, चारा उत्पादन करण्यासाठी चारा छावण्या सुरु करण्याची सध्या गरज नाही. तसेच, चारा आयात करण्याचीही गरज नाही, असे मत मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे. अहमदनगर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. पाऊस कमी झाला की, धरणे कमी भरतात. त्यामुळे आता पश्‍चिम वहिनी नद्याचे पाणी गोदावरी खोर्‍यात आणायची योजना आपण हाती घेतली आहे, अशीही माहीती विखे पाटील यांनी दिली आहे. नगर जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई असून नागरिकांवर पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात पाच-सहा दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या टँकर्सवर अवलंबून राहावे लागत आहे.

COMMENTS