Homeताज्या बातम्या

ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर : पालकमंत्री

सातारा / प्रतिनिधी : ग्रामीण भागांचा विकास करण्यासाठी रस्ते, पाणी, लाईट, शाळा, आरोग्य सेवा यासारख्या पायाभूत सुविधांच्या विकासावर शासन प्राधान्

पेटा संघटना बैलगाडा शर्यतीविरोधात घटनापीठाकडे मागणार दाद
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर अ‍ॅसिड हल्ला
एका विजयाने मविआ ला हुरळून जायची गरज नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  

सातारा / प्रतिनिधी : ग्रामीण भागांचा विकास करण्यासाठी रस्ते, पाणी, लाईट, शाळा, आरोग्य सेवा यासारख्या पायाभूत सुविधांच्या विकासावर शासन प्राधान्याने भर देत आहे. या सुविधा पूर्णत्वास नेणे ही लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन, खनिकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी केले.
अडुळपेठ येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोनमधून अडुळ ते डिगेवाडी रस्ता सुधारणा करणे, अडुळ साळुंखेवस्ती रस्त्यावरील ओढ्यावर साकव बांधणे या कामांचे संयुक्त भूमीपूजन तसेच मल्हारपेठ येथे मल्हार पेठ, मंद्रूळहवेली, पानसकरवाडी, जमदाडवाडी, नवसारवाडी यांना जोडणार्‍या मल्हारपेठ ते जमदाडवाडी रस्त्याची सुधारणा करणे या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग पाटणचे उपअभियंता एस. वाय. शिंदे, डीगेवाडीचे सरपंच अर्चना नलवडे, उपसरपंच राजेश शिर्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब पाटील, मल्हारपेठचे सरपंच आर. बी. पवार, उपसरपंच पुरुषोत्तम चव्हाण यांचेसह सर्व विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
ना. शंभूराजे देसाई म्हणाले, गाव, वाड्या-वस्त्यांवर वॉर्ड निहाय पायाभूत सुविधांवर शासन भर देत असले तरी या सुविधांची अखंडपणे निगा राखण्यासाठी खर्च येतो. यासाठी ग्रामपंचायतींनीही प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी ग्रामपंचायत स्वतःचे उत्पन्न वाढवून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत. गाव स्वच्छ राहिले पाहिजे, गावातील नाले, गटारीची स्वच्छता राखली पाहिजे. बाजारपेठांमध्ये स्वच्छता असली पाहिजे. गावे सुशोभीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावेत, यासाठी शासन त्यांना मदत करेल, असेही ते यावेळी म्हणाले.

COMMENTS