Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

त्रिवेणीश्‍वर येथील श्रीमद भागवत कथा सोहळयाचे ध्वजपूजन उत्साहात

12 ते दि.19 ऑगस्ट मध्ये होणार श्रीमद भागवत कथा सोहळा

नेवासाफाटा : नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव-सुरेशनगरच्या मध्यावर असलेल्या श्री क्षेत्र त्रिवेणीश्‍वर महादेव देवस्थान येथे दि.12 ऑगस्ट ते दि.19 ऑगस

वाळू तस्करांवर मोठी कारवाई ; पोकलेनसह दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
बसमध्ये विसरलेला मोबाईल प्रवाशाला केला परत
बोगस बियाणेप्रकरणी कंपन्यांवर कारवाई का नाही ?

नेवासाफाटा : नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव-सुरेशनगरच्या मध्यावर असलेल्या श्री क्षेत्र त्रिवेणीश्‍वर महादेव देवस्थान येथे दि.12 ऑगस्ट ते दि.19 ऑगस्ट या कालावधीत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या  होणार्‍या श्रीमद भागवत कथा सोहळयाचे धर्मध्वजपूजन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते व त्रिवेणीश्‍वर देवस्थानचे महंत श्री रमेशानंदगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी त्रिवेणीश्‍वर देवस्थानच्या सभामंडपामध्ये झालेल्या कार्यक्रम प्रसंगी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा त्रिवेणीश्‍वर देवस्थानच्या वतीने स्वामी रमेशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्रिवेणीश्‍वर देवस्थान हे प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून या क्षेत्राला तीर्थक्षेत्र कवर्ग दर्जा आहे,वर्षभर चालणार्‍या उत्सवात लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता या क्षेत्राला तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जा मिळण्यासाठी खासदार साहेबांनी प्रयत्न करावा अशी मागणी श्री रमेशानंदगिरी महाराज यांनी यावेळी बोलताना केली.
                प.पू. ब्रम्हलिन अजानबाहु भक्त योगिराज प्रल्हादगिरीजी महाराज व श्रीश्रीश्री 1008 महामंडलेश्‍वर स्वामी शिवानंदगिरीजी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने तसेच देवगड दत्त पिठाचे महंत गुरुवर्य ह.भ.प.श्री भास्करगिरीजी महाराज,महंत सुनिलगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने महंत रमेशानंदगिरीजी महाराज यांचे मार्गर्शनाखाली योगिराज प्रल्हादगिरीजी महाराज यांचा 26 वा पुण्यतिथी सोहळा साजरा होत आहे.त्या पार्श्‍वभूमीवर होणार्‍या श्रीमद भागवत कथा सोहळयाचे धर्म ध्वजपूजन व मंडप पूजन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आले. भानसहिवरा येथील राजू देवा जोशी यांनी धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य केले. यावेळी बोलतांना नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, येथे होणार्‍या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक वेळा मी येथे आलो एक नवी ऊर्जा येथून मला मिळाली या क्षेत्राला ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा देण्यासाठी मी मनापासून प्रयत्नांची पराकाष्ठा करेन अशी ग्वाही यावेळी बोलतांना दिली तर आमदार शंकरराव गडाख साहेबांनी माझ्या विजयासाठी आपली ताकद पणाला लावली असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पाठबळ द्या असे आवाहन केले.
    यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी शिवसेनेचे हरिभाऊ शेळके,काकासाहेब शिंदे,सुरेशनगरचे सरपंच कल्याणराव उभेदळ,श्रीरामपूर येथील मकरंद राजहंस, हंडीनिमगावचे भिवाजीराव आघाव, उपसरपंच नाथा बाबर,विठ्ठल पाषाण शेतकरी नेते पी.आर.जाधव, संभाजीराव मते,राष्ट्रवादीचे गफूरभाऊ बागवान, सुरेश उभेदळ, शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन जगताप,पंकज लांभाते,नेवासा वकील संघाचे अध्यक्ष कल्याणराव पिसाळ,अँड.बाळासाहेब चव्हाण, राजू लांडे, बाबासाहेब गोल्हार,बदाम महाराज पठाडे, नाथाभाऊ बाबर,शिवभक्त विष्णू नाबदे,मनोहर जाधव, गोरख गुंजाळ, अमृत उभेदळ,युवा सेनेचे कैलास लष्करे, साईनाथ लष्करे,गणेश झगरे,सुरक्षा रक्षक दगडू पिटेकर यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.त्रिवेणीश्‍वर भक्त मंडळाचे सेवेकरी पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर खा.वाकचौरे यांचे स्वीय सहायक बाळासाहेब सोनवणे यांनी उपस्थित भाविकांचे आभार मानले.

COMMENTS