Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री श्री रविशंकर विद्यामंदिर येथे महाराष्ट्र दिनानिमित्त  ध्वजारोहनाचा कार्यक्रम

बीड प्रतिनिधी - शहरातील श्री श्री रविशंकर विद्यामंदिर येथे 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहनाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी  शाळेचे अध्यक्ष

ऑक्सिजन तुटवड्यावरुन रामदेव बाबांचं वादग्रस्त वक्तव्य | सकाळच्या ताज्या बातम्या | LokNews24
पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू
इलेक्ट्रीक वाहनांच्या बॅटर्‍या भारत उत्पादित करणार

बीड प्रतिनिधी – शहरातील श्री श्री रविशंकर विद्यामंदिर येथे 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहनाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी  शाळेचे अध्यक्ष श्री जैन सर सचिव श्री पारगावकर सर शाळेचे मुख्याध्यापक श्री हंसे सर शाळेच्या उपमुख्याध्यापिका अनिता सूर्यवंशी मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
आपले मनोगत व्यक्त करतांना मान्यवर म्हणाले की, महाराष्ट्राने देशाच्या सांस्कृतिक वारसाची जबाबदारी सुरुवातीपासून स्वीकारली  तसेच देशाला अनेक देशभक्त दिले.  महाराष्ट्रातील लेखक यांनी सामाजिक विचार रुजविण्याचा प्रयत्न देशभर केला. तसेच महाराष्ट्राने साहित्य ,कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृति, नाट्य, चित्रपट, संगीत, सहकार, कृषी उद्योग, संगणक, विज्ञान या सर्वत्रात भरारी घेवून देशाला योगदान दिले आहे अशा या महाराष्ट्राचे वैभव जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे त्यांनी मनोगतामध्ये म्हटले आहे.या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

COMMENTS