Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शारदा शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात

राहाता प्रतिनिधी ः रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुलामध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केला होता. संकुलाचे प्राचार

पो. नि. प्रताप दराडे यांच्या नियुक्तीची राहूरीकरांनी केली मागणी
किरकोळ वादातून परप्रांतीय तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून 
पाच रुपयांचा मास्क पंधराला, तर दीड हजाराचा पलंग साडेसात हजाराला

राहाता प्रतिनिधी ः रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुलामध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केला होता. संकुलाचे प्राचार्य सहाय्यक विभागीय अधिकारी उत्तर विभाग माननीय प्रमोद तोरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
त्यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संकुलाचे अध्यक्ष रमेश शिंदे, डॉ. पी.जी.गुंजाळ, मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे, उपप्राचार्य रामभाऊ गमे, प्राचार्य निशा चेंगोट, प्रा. शरद गमे अशोक बोरसे, राजेंद्र पटारे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .त्यानंतर पाचवी ते नववी व आकरावी विद्यार्थ्यांचा निकाल देण्यात आला. संकुलातील वर्गात प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती विकसित होण्याच्या दृष्टीने पुस्तक देऊन त्यांचा सन्मान केला. विद्यालयातील इन्स्पायर अवॉर्ड मानांकन प्राप्त विद्यार्थी साई प्रमोद राहींज याचा रमेश शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

COMMENTS