Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरफोडी प्रकरणातील पाच वर्षे फरारी संशयितास अटक

दहिवडी / प्रतिनिधी : घरफोडी प्रकरणातील पाच वर्षे फरारी संशयित मारुती शामराव तुपे (आगाशिवनगर, ता. कराड) याला दहिवडी पोलिसांनी शिताफीने अटक करण्यास पोल

उंबर्डे फाट्यावरील ’त्या’अपघातातील जखमीचा मृत्यू
विरोधकांकडून शेतकर्‍यांचे अर्थिक शोषण : निशिकांत भोसले-पाटील
जलसंपदा मंत्र्यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा सभेवर बहिष्कार

दहिवडी / प्रतिनिधी : घरफोडी प्रकरणातील पाच वर्षे फरारी संशयित मारुती शामराव तुपे (आगाशिवनगर, ता. कराड) याला दहिवडी पोलिसांनी शिताफीने अटक करण्यास पोलिसांना यश आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, 14 एप्रिल 2016 रोजी किरकसाल (ता. माण) येथील एकनाथ अवघडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात असलेली दुचाकी चोरून नेली होती. ही दुचाकी नितीन तुपे (आगाशिवनगर, ता. कराड) याच्याकडे 21 डिसेंबर 2016 रोजी सापडली होती. त्याला अटक करून तपास केला असता मारुती तुपे हा संशयित निष्पन्न झाला होता. गुन्हा घडल्यापासून तो फरारी होता.
19 ऑक्टोबर 2021 रोजी मारुती तुपे हा किरकसाल येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच सापळा रचून त्यास शिताफीने अटक करण्यात आली. सपोनि संतोष तासगावकर, सहायक फौजदार पी. जी. हांगे, पोलिस हेड कॉन्स्टेबल एस. एन. केंगले, पोलीस नाईक रवींद्र बनसोडे व प्रमोद कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

COMMENTS