शिक्रापूर प्रतिनिधी - परम श्रध्येय गुरूवर्य ह. भ. प. पांडुरंग महाराज घुले यांनी श्री क्षेत्र देहू येथे जागतीक किर्तीचे गाथा मंदिर उभे केले असू
शिक्रापूर प्रतिनिधी – परम श्रध्येय गुरूवर्य ह. भ. प. पांडुरंग महाराज घुले यांनी श्री क्षेत्र देहू येथे जागतीक किर्तीचे गाथा मंदिर उभे केले असून सदर मंदिराच्या आवारातच श्रीधरा गोशाळेची उभारणी करून शंभरहून अधिक गाईंची सेवा तेथे चालू असताना या गोमातेंची सेवा करण्यासाठी कान्हूर मेसाई व मिडगुलवाडी या दुष्काळी समजल्या जाणाऱ्या गावांमधून गोशाळेसाठी तब्बल पाच ट्रक कडबा देण्यात आला आहे.
कान्हूर मेसाई व मिडगुलवाडी ता. शिरुर येथून श्रीधरा गोशाळेसाठी जनावरांना चारा म्हणून कडबा देण्यासाठी ह. भ. प. सुदाम महाराज मिडगुले, कान्हूर मेसाई गावचे समाजसेवक शहाजी दळवी व ह. भ. प. पोपट महाराज मिडगुले यांच्या वतीने विशेष प्रयत्न सुरु करण्यात आलेले असताना सदर गोशाळेतील गोमातेच्या सेवेसाठी ह. भ. प. सुदाम महाराज मिडगुले, ह. भ. प. पोपट मिडगुले, शंकर कदम, सतीश दाते, साहेबराव आदक या सर्वांच्या वतीने प्रत्येकी एक ट्रक कडबा तर मंचर परिसरातून एक ट्रक कडबा, तसेच मुंबई येथील उद्योजक महेंद्र मेहता यांच्या वतीने कडब्यासाठी पाच हजार रुपयांचा धनादेश आणि मुख्याध्यापक किसन हारपुडे, दत्तात्रय खर्डे यांच्या वतीने प्रत्येकी शंभर पेंडी तर भाऊसाहेब दळवी यांच्या वतीने पंचवीस पेंडी कडबा देण्यात आला. तर यावेळी बोलताना आपल्या परिसरातील गोशाळा, वन्य प्राणी संरक्षण संस्था यांना मदत करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे समाजसेवक शहाजी दळवी यांनी सांगितले, तर दुष्काळी समजल्या जाणाऱ्या गावांनी पुढाकार घेत तब्बल पाच टेम्पो कडबा जनावरांसाठी उपलब्ध करुन दिल्याने श्रीधरा गोशाळेच्या वतीने ग्रामस्थांचे आभार मानले.
COMMENTS