मायणी / वार्ताहर : येथील बालाजी ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तपासाच्या कामाला गती दिली आहे. यासाठी पाच पथके विविध
मायणी / वार्ताहर : येथील बालाजी ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तपासाच्या कामाला गती दिली आहे. यासाठी पाच पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली असल्याचे पोलीस उपनिरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी सांगितले.
खटाव तालुक्यातील मायणीसारख्या ग्रामीण भागात बंदूक रोखून ज्वेलरी लुटण्याचा प्रकार पहिल्यांदा घडला. या प्रकाराने सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीसही या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त करत आहेत. या प्रकाराने परिसरातील नागरिक व व्यापारी भयभीत झाले आहेत. सशस्त्र दरोडाप्रकरणी कोणत्याही परिस्थितीत संशयित गजाआड झाले पाहिजेत, असे आदेश पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिले आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी कामाला लागले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि स्थानिक पोलीस संयुक्तपणे घटनेचा तपास करत आहेत.
त्यासाठी दहिवडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी पाच तपास पथके तयार केली आहेत. विटा ते दहिवडी पट्ट्यातील हॉटेल, ढाबे स्थानिक पथकाकडून पिंजून काढले जात आहेत. शेजारील सांगली जिल्ह्यातील विटा, आटपाडी परिसर, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, म्हसवड या भागांतही पथके रवाना करण्यात आली आहेत. आज दिवसभर पथके तपास करत फिरत आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या हाती काहीही ठोस पुरावे लागले नसल्याचे समजते.
COMMENTS