पुणे/प्रतिनिधी ः पुणे मनपा अंर्तगत अतिक्रमण कारवाई करण्याचे काम पथकातील कर्मचारी कैलास स्मशानभूमी ते आरटीओ कार्यालय यादरम्यान करत होते. त्यावेळी
पुणे/प्रतिनिधी ः पुणे मनपा अंर्तगत अतिक्रमण कारवाई करण्याचे काम पथकातील कर्मचारी कैलास स्मशानभूमी ते आरटीओ कार्यालय यादरम्यान करत होते. त्यावेळी सार्वजिनक रक्स्त्यारवरील हात गाडयांवर अतिक्रमण विरोधी पथक कारवाई करताना, सदर पथकास बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी पाच जणांना अटक केल्याची माहिती बुधवारी दिली आहे.
गणेश परदेशी (वय-40), रोहित परदेशी (25), रोहन परदेशी (25), महेश परदेशी (33), सुरज परदेशी (20) या पाचजणांना अटक करण्यात आली आहे. तर त्यांच्यासह प्रतीगणेश परदेशी , शामा सुपरसिंग परदेशी (50) यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक प्रशांत प्रल्हाद कोळेकर यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. 16 मे रोजी संबंधित ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावरील हात गाडयांवर अतिक्रमण कारवाई करण्याचे तक्रारदार हे त्यांचे सरकारी काम करत होते. त्यावेळी संबंधि आरोपींनी सदरची कारवाई करु नये म्हणून गैरकायद्याची मंडळी जमवुन त्यांना शिवीगाळ करुन, बघुन घेण्याची धमकी देऊन हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तक्रारदार यांच्या सोबतचे अतिक्रमण कारवाईस हजर असलेले सुरक्षा रक्षक आकाश लोंखडे यांनाही हाताने मारहाण करुन, धक्का बुक्की करुन डोक्यात लोखंडी झार्या मारुन जखमी करुन त्यांचे सरकारी काम करण्यापासून परावृत्त केले आहे. याबाबत पुढील तपास ंबडगार्डन पोलिस करत आहे. पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचार्यांना फेरवाल्यांकडून मारहाण केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी पुणे महापालिकेच्या समोर अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले. अनाधिकृत फेरीवाल्यांकडून अतिक्रमण पथकास वारंवार शिवीगाळ व मारहाण करण्यात येते याचा निषेध करत, पोलिसांनी संबंधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
COMMENTS