मुंबई / प्रतिनिधी : अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकर्यांच्या धास्तीत भर पडली आहे. बोर्डी परिसरातील शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीत असताना पावसामुळे
मुंबई / प्रतिनिधी : अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकर्यांच्या धास्तीत भर पडली आहे. बोर्डी परिसरातील शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीत असताना पावसामुळे रोपांची लागवड करण्यासाठी वातावरण अनुकूल राहणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. समुद्रातील धोका लक्षात घेऊन मच्छीमार बांधवांनी मासेमारी बंद करून किनार्यावर येण्याचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगामातील भाताचे पीक घेतल्यानंतर बोर्डी परिसरातील अनेक शेतकरी पिकाची मळणीचे काम उरकून रोजगारासाठी स्थलांतर करतात. शेतकर्यांकडे पाण्याची सुविधा उपलब्ध आहे, ते रब्बी हंगामातील पीक घेण्याच्या कामात व्यस्त असतात. मोठ्या प्रमाणात वेलवर्गीय भाज्या व फळभाज्या घेण्याचा शेतकर्याचा कल असतो. नुकतीच दिवाळी आनंदात साजरा करून शेतकरी वर्ग जमिनी नांगरणे व अन्य मशागत करण्याकडे कामाला लागला आहे. मात्र आज (ता. 26) पहाटेपासून बोर्डी आणि परिसरात सूर्यदर्शन झाले नाही.
पावसाची रिपरिप सुरू झाल्यामुळे शेतात ठेवलेली भाताची उडवी झाकताना शेतकर्यांची तारांबळ उडाली. हवेत किंचित गारवा निर्माण झाला होता. परंतू 11 वाजण्याच्या सुमारास पुन्हा ढगांचा गडगडाट सुरू झाला होता. दुपारी बारा वाजता पावसाला सुरुवात झाली. बोर्डीमध्ये ढगाळ वातावरण होते व काळाकुट्ट अंधार पडला होता. पश्चिम भागातून ढगांचा गडगडाट सुरू झाल्याने पावसाचे प्रमाण वाढून शेतीचे मोठे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दिवाळीनंतर मच्छीमारांनी समुद्रातील मासेमारीला सुरुवात केली होती. नोव्हेंबरमध्ये मच्छीमार बांधव मासळी सुकवण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. परंतु अचानक सुरू झालेल्या पावसाने सुकवण्यासाठी ठेवलेली मच्छी खराब झाली. परंतू पुढील काही दिवसात मासे सुकवणे अडचणीचे झाले आहे.
COMMENTS