Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खामगाव जिल्हा परिषद शाळा तालुक्यात प्रथम

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा ः मुख्याध्यापिका कीर्ती पालवे यांचा गौरव

शेवगाव तालुका ः राज्यात नुकत्याच घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या राज्यस्तरीय अभियानात शेवगाव तालुक्यातील खामगाव येथील जिल्हा

अहमदनगर महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा l पहा LokNews24
तालुकास्तरांवर ऑक्सिजन कोविड सेंटर व्हावेत ; आ. जगतापांनी घातले पवारांना साकडे
फटाका बॉम्ब फोडण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी अनुदानाचा बॉम्ब फोडा-सुजय विखे | LOKNews24

शेवगाव तालुका ः राज्यात नुकत्याच घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या राज्यस्तरीय अभियानात शेवगाव तालुक्यातील खामगाव येथील जिल्हा परिषद शाळा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे. याबद्दल माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी जिल्ह्यातील जिल्हास्तरीय तालुकास्तरीय बक्षीस प्राप्त शिक्षकांचा गौरव शेवगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमात केला.
यावेळी शेवगावचे माजी सभापती अरुण पाटील लांडे, बबन भुसारी, अंबादास कळमकर, संजय कोळगे, ताहेर पटेल, बाबूलाल भाई पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. शेवगाव-नेवासामार्गावरील खामगाव फाट्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खामगाव जिल्हा परिषद शाळेत शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती पालवे यांनी शाळेतील सहशिक्षक यांच्या सहकार्याने शाळेत गुणवत्ते बरोबरच सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी यासह अनेक विषयावर सातत्याने भर देऊन परिसर स्वच्छता व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे प्राप्त होईल. याकडे लक्ष देऊन शाळेचेरूप पालटण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून परिणामी स्वतःच्या कौटुंबिक गोष्टीकडे ही दुर्लक्ष करून शाळेसाठी शाळाबाह्य वेळ उपलब्ध करून विद्यार्थ्यांमध्ये रमत काम केल्यामुळेच या सत्कारापर्यंत आपण पोहोचू शकलो. याचे समाधान वाटते अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खामगाव जिल्हा परिषद शाळेला यापूर्वी 2016-17 मध्ये शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम मध्ये पहिला नंबर तर 2017-18 मध्ये याच उपक्रमात तृतीय क्रमांक मिळाला होता सण 2020-21 ला सांस्कृतिक कार्यक्रम वैयक्तिक वेशभूषा नाटक सामूहिक गायन तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवलला,भूषण कुलकर्णी सरांच्या मार्गदर्शनाखाली एज्युकेशनल व्हिडिओ बनवून अध्यायन व अद्यापनात वापर करणारी महाराष्ट्रातील पहिली महिला शिक्षिका होण्याचा मान कीर्ती पालवे व कौसर खान यांना मिळाला. त्यातच शाळेला मिळालेला प्रथम क्रमांक शिक्षकांचे बळ वाढवणार्‍या आहे. मुख्याध्यापक पालवे यांच्या झालेल्या सन्मान बरोबर उर्दू शाळेचे मुख्याध्यापक सलीम शेख, कौसर खान, आशाताई घुटे,अंगणवाडी कर्मचारी बडधेताई यांचेही परिसराततून पालकसह नागरिकांतून कौतुक होत आहे.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद खामगाव शाळा शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे तालुक्यासह जिल्ह्यात नावलौकिक मिळवत आहे.याचा अभिमान वाटतो. कौटुंबिक अडीअडचणी असतानाही शाळेच्या वेळेत हजर राहून विद्यार्थ्यांना शालेय ज्ञानाचे धडे देत असतानाच इतरही सामाजिक ज्ञानातही भर पडेल. असे विविध उपक्रम राबवून कीर्ती पालवे व शाळेचे सहशिक्षक यांनी केलेल्या कामाचे फळ त्यांना बक्षीस रूपाने मिळतच आहे. शिक्षक करत असलेल्या कामाचे माजी आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील यांनीही तोंड भरून कौतुक केले. त्याचबरोबर परिसरातील नागरिकांनाही त्यांच्या या कार्याचा अभिमान वाटतो.उपक्रमशील शिक्षक शाळेला दिशा देऊ शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणून खामगाव जिल्हा परिषद शाळेकडे पाहता येईल.
बाबूलालभाई पटेल, सामाजिक कार्यकर्ते खामगाव शेवगाव

COMMENTS