Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बृहन्मुंबई महानगरपालिका ‘वाचन प्रेरणा दिन’स्पर्धेत प्रथम

मुंबई : माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने घेण्यात

६०० बैलजोड्या आणि हजारो प्रेक्षक पहा बैलगाडा शर्यत
केंद्रप्रमुखांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्तच
सारेगमपमध्ये ऑडिशनसाठी आली 12 वर्षांची रिक्षाचालकाची मुलगी

मुंबई : माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेचे निकाल मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. यात बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि तृतीय क्रमांक भिंवडी-निजामपूर महानगरपालिका यांना जाहीर झाला आहे.
वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने मराठी, अमराठी लोकांमध्ये मराठी बाबत आपुलकी वाढीस लागावी, जागृती निर्माण व्हावी म्हणून सर्व महानगरपालिका स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्राची राजभाषा मराठी या विषयाच्या अनुषंगाने मराठी, अमराठी लोकांमध्ये मराठीबाबत आपुलकी वाढीस लागावी, जागृती निर्माण व्हावी म्हणून अभिनव कल्पनेच्या आधारे जसे की, अभिनव कल्पनेत संगीत, छायाचित्रीकरण, रेखाचित्रे, घोषवाक्य आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे विषय मांडणी इत्यादी विविध माध्यमांचा उपयोग करुन महानगरपालिका क्षेत्रातील अधिकारी – कर्मचारी यांनी वरील माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना शिक्षित करावयाचे अपेक्षित होते. स्पर्धेत महानगरपालिकेच्या कमीत कमी 10 अधिकारी- कर्मचारी यांनी भाग घेणे आवश्यक होते. 27 महानगरपालिकांपैकी 8 महानगरपालिकांचे प्रस्ताव विहित मुदतीत प्राप्त झाले होते.

COMMENTS