चंद्रपूर/प्रतिनिधी ः चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गुरुवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास मुल येथे गोळीबार

चंद्रपूर/प्रतिनिधी ः चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गुरुवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास मुल येथे गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात रावत यांच्या डाव्या हाताला गोळी स्पर्शून गेल्याने त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली. हल्लेखोर स्विफ्ट डिझायर गाडीने आले होते. हल्ल्यानंतर हल्लेखोर नागपूर मार्गे पसार झाले. यात त्यांच्या डाव्या हातावर गोळी लागली असून त्यांना दुखापत झाली. गोळी झाडताच गाडीसह मारेकरी पसार झाले. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली. गोळी हातावर लागून बाहेर गेल्याने ते बालंबाल बचावले.
COMMENTS