Homeताज्या बातम्याविदेश

पाकिस्तानकडून सीमा भागात गोळीबार

एका जवानासह 4 नागरिक जखमी

श्रीनगर ः पाकिस्तानकडून नेहमीच सीमा भागामध्ये शस्त्रसंधीचे उल्लघंन करण्यात येत असून, पाकिस्तानी सेनेकडून पुन्हा एकदा जम्मू काश्मीर सीमेवर गुरूवार

अहमदनगर यतीमखाना संस्थेतील माजी विद्यार्थी 30 वर्षानंतर आले एकत्र
राज्यात उष्माघाताचे चार बळी
अकोले येथे सर्वधर्मीय वधू-वर मेळावा उत्साहात

श्रीनगर ः पाकिस्तानकडून नेहमीच सीमा भागामध्ये शस्त्रसंधीचे उल्लघंन करण्यात येत असून, पाकिस्तानी सेनेकडून पुन्हा एकदा जम्मू काश्मीर सीमेवर गुरूवारी उशीरा रात्री गोळीबार करण्यात आला. अडीच वर्षानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. जम्मूच्या अरनिया आणि आरएसएसपुरा सेक्टरच्या बॉर्डरवर गोळीबार झाला आहे.
या गोळीबारात बीएसएफचे एक जवान जखमी झाले आहेत. तसेच 4 स्थानिक रहिवाशी देखील जखमी झाल्याची माहिती एएनआयने दिली आहे. पाकिस्तानी रेंजर्सकडून 5 चौक्यांवर गोळीबार झाल्याची माहिती बीएसएफ अधिकार्‍यांनी दिली. मागच्या 10 दिवसात पाकिस्तानकडून दुसर्‍यांदा सिजफायरचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घरातील दिवे बंद करून अंधारामध्ये घरात थांबा असे आवाहन येथील नागरिकांना करण्यात आले आहे. काल रात्री 8 वाजल्यापासून गोळीबाराला सुरुवात झाली होती. गोळीबारासह मोर्टारनेही हल्ला करण्यात आला आहे. मात्र हा हल्ला एका भिंतीवर झाल्याने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आर्निया सेक्टरमध्ये राहणार्‍या व्यक्तींना घरामध्येच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काल देखील लष्कराने पाकिस्तानी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. यावेळी केलेल्या कारवाईत 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. काश्मीरचे अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी याबाबत माहिती दिली आहे. कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर ही कारवाई करण्यात आली.

COMMENTS