Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत अग्नितांडव! मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग

सात जणांचा होरपळून मृत्यू

मुंबई प्रतिनिधी - मुंबईतील गोरेगाव परिसरातील असणाऱ्या समर्थ नावाच्या इमारतीला गुरुवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ७ जणांचा मृत

मातंग समाजाच्या प्रगतीतून आणखी महापुरुष निर्माण होतील – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
लोकसभा अध्यक्षपदासाठी रस्सीखेच
मुंबईची हवा मध्यम श्रेणीत ; थंडीची अजूनही प्रतीक्षा

मुंबई प्रतिनिधी – मुंबईतील गोरेगाव परिसरातील असणाऱ्या समर्थ नावाच्या इमारतीला गुरुवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये ५ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण गुलदस्त्यात आहे. या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव परिसरात समर्थ नावाची पाच मजली इमारत आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास या इमारतीच्या पार्किंगला भीषण आग लागली.

बघता बघता आगीने संपूर्ण इमारतीला विळखा घातला. यामध्ये इमारतीत राहणारे अनेक नागरिक जखमी झाले. या घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीत होरपळलेल्या नागरिकांना तातडीने उपचारासाठी कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना ५ महिला आणि २ पुरुषांचा मृत्यू झाला. अजूनही ४० जणांवर उपचार सुरू असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या आगीत तळमजल्यावर वरील काही दुकाने आणि समोर पार्क असलेल्या गाड्या जळून खाक झाल्याची माहिती देखील मिळत आहे.

COMMENTS