कल्याण इमारतीच्या टेरेस वरील मोबाईल टॉवरला आग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कल्याण इमारतीच्या टेरेस वरील मोबाईल टॉवरला आग

कल्याण प्रतिनिधी - सुदैवाने जीवितहानी टळली  अनधिकृत मोबाईल टॉवरचा प्रश्न ऐरणीवर. कल्याण पूर्व अडवली गावातील समर्थ नगर परिसरात असलेल्या शिवशक्ती सो

पोलीस भरतीचा सराव करताना २३ वर्षीय युवकाचा मैदानावरच मृत्यू.
मनसे कार्यकर्ता खूनप्रकरणी जळगावच्या पाचजणांना अटक
प्रसिद्ध अभिनेत्रीने रस्त्यावर मागितली भिक्षा

कल्याण प्रतिनिधी – सुदैवाने जीवितहानी टळली  अनधिकृत मोबाईल टॉवरचा प्रश्न ऐरणीवर. कल्याण पूर्व अडवली गावातील समर्थ नगर परिसरात असलेल्या शिवशक्ती सोसायटीच्या टेरेसवरील मोबाईल टॉवरला आग लागल्याची घटना रात्री दहा वाजन्याच्या सुमारास घडली .. आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच  अग्निशमन दलाने  तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.  तासाभराच्या अथक  प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं.. टॉवरला आग लागल्यानंतर काही क्षणातच भडकलेल्या आगीमुळे इमारतीमधील रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलं होतं.  रहिवाशांनी इमारतीमधून बाहेर पळ काढला.तब्बल तासाभराच्या  प्रयत्नानंतर या मोबाईल टॉवर वरील आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं. दरम्यान हा मोबाईल टॉवर अनधिकृत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केलाय. टॉवर काढून टाकण्याबाबत अनेकदा संबंधित बिल्डरकडे मागणी केली मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील या वेळेस स्थानीकांनी केला. या घटनेमुळे इमारतीवर लावण्यात येणारा अनधिकृत टॉवरचा प्रश्न देखील आता ऐरणीवर आला आहे.

COMMENTS