Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे प्रादेशिक सा.बां.विभागात मुख्य अभियंता यांचा आर्थिक धुडगूस

पुणे ः पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागात सध्या मुख्य अभियंता आपल्या अधिकारांचा गैरवावर करत असून, त्यांनी शासकीय नियमांना तिलांजली देत आर्थ

चौकशी समितीवरच होणार प्रशासकीय कारवाई -शिक्षण उपसंचालक उकीरडे
सचिव भांगे यांचा छ. संभाजीनगरचा दौरा गोपनीय का ?
सामाजिक न्याय दिन ‘अन्याय दिन’ म्हणून साजरा करावा का ?

पुणे ः पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागात सध्या मुख्य अभियंता आपल्या अधिकारांचा गैरवावर करत असून, त्यांनी शासकीय नियमांना तिलांजली देत आर्थिक धुडगूस मोठ्या प्रमाणावर राबवण्यास सुरूवात केली आहे. या निविदा घोटाळ्यांच्या माध्यमातून कोण-कोणाचे हात ओले झाले आहे, याची चौकशी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी करणे गरजेची आहे. या भ्रष्टाचाराच्या कुरणामध्ये मुख्य अभियंता यांच्या कृपाशिवार्दाने निविदा घोळ सुरू आहे. हा घोळ तब्बल 1 हजार 33 कोटींचा असून, याप्रकरणी मुख्यमंत्री महोदयांनी दखल घेवून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणे अत्यावश्यक बनले आहे.
या घोटाळ्याचे गौडबंगाल असे की, नॅशनल हायवे अ‍ॅथारिटी, किंवा इतर ठिकाणी, जवळजवळ निविदा 25 टक्के बिलो याने करण्यात आले होते. मात्र पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत म्हणजेच सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर या प्रदेशात जे 1 हजार 33 कोटींचे टेंडर झाले आहे, ते टेंडर 5 टक्के, तर कुठे 0.2 टक्के, तर कुठे 0.5 टक्के अशा प्रमाणात टेंडर बिलो करण्यात आले आहेत. त्यामुळे या टेंडर निविदेमध्ये मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याचे दिसून येत आहे. फक्त कागदोपत्री दाखवण्यासाठीच 0.2 टक्के बिलो दाखवलण्यात आले आहेत. त्यामुळे अशा टेंडरमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. टेंडर मिळणार्‍या कंपन्या, एजन्सी आणि मुख्य अभियंता यांच्या संगनमताने या निविदांमध्ये घोटाळा करण्यात आला असून, त्यातून मोठा आर्थिक फायदा या कंत्राटदार, एजन्सी आणि मुख्य अभियंता यांचा झाल्याचे दिसून येत आहे. आर्थिक देवाण-घेवाणीतून जनतेच्या पैशांच्या अपव्यय करण्यात आला आहे.

उद्याच्या अंकात वाचा…
पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागात मुख्य अभियंता यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत, काही कंत्राटदार आणि एजन्सी यांना हाताशी धरून निविदा घोटाळा करून राज्य सरकारची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी निविदांमध्ये कसा घोळा घातला, निविदा कमी दराने घेतल्याचे दाखवण्यात आले असले तरी, मुळातच अंदाजित रक्कम कशी वाढवली, याच्या आकडेवारी आणि पुराव्यासह कव्हर स्टोरी वाचा उद्याच्या अंकात

निविदा कमी दराने काढल्याचे गौडबंगाल – पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये रस्त्यांच्या कामांसाठी जी अंदाजपत्रके तयार करण्यात आली, ती अंदाजपत्रकेच मुळात जास्त मोजमाप दाखवून करण्यात आली आहेत. अंदाजपत्रके काढण्यापूर्वी त्यावरती एक महिन्यांपूर्वी देखभाल दुरूस्तीच्या नावाखाली लाखोंचा खर्च करण्यात आला आहे.त्यामुळे ही कामे कामे 5, 7 किंवा 10 टक्के कमी दराने करण्यात आली आहे. मुळातच अंदाजे रक्कम मात्र जास्त प्रमाणात दाखवून यात अपहार झालाच नाही, असा भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न मुख्य अभियंता यांच्याकडून चालवला आहे. मात्र या निविदा घोटाळ्यातून मुख्य अभियंता यांनी कोट्यावधींची माया गोळा केली आहे. या गैरव्यवहारातून राज्य सरकारचे आणि जनतेच्या पैशांची लूट मुख्य अभियंता यांनी चालवली आहे.  

पुणे प्रा. विभागातील हा एक हजार कोटींचा घोटाळा
1) पुणे नार्थ 104 कोटी 29 लाख 06 हजार
2) सातारा 137 कोटी 21 लाख 80 हजार
3) सातारा-वेस्ट 192 कोटी 46 लाख 54 हजार
4) सांगली 188 कोटी 67 लाख 85 हजार
5) मिरज 76 कोटी 23 लाख 24 हजार
6) कोल्हापूर 149 कोटी 29 लाख 43 हजार
7) कोल्हापूर दक्षिण 68 कोटी 73 लाख 25 हजार
8) कोल्हापूर स्पे.प्रो. 3 कोटी 74 लाख 16 हजार

कंपन्यांनी बोगस कागदपत्रांद्वारे मिळवली टेंडर – पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत 1 हजार 33 कोटींच्या निविदा घेणार्‍या कंपन्या, एजन्सी यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ही टेंडर लाटल्याचे दिसून येत आहे. यामध्ये कंत्राट घेणार्‍या कंपनीचे किंवा एजन्सीचे तीन वर्षांचा टर्नओव्हर किंवा अर्नेस्ट मनी, तसेच तीन वर्षांचा कॅश फ्लो, तसेच तीन वर्षांचे वर्कडन सर्टिफिकेट या कागदपत्रांमध्ये बोगसगिरी करून या कंपन्यांनी आणि एजन्सींनी निविदा लाटल्या आहेत. त्यामुळे या कंपन्यांचे आणि पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांचे अर्थपूर्ण देवाण-घेवाण असल्याशिवाय या निविदांमध्ये भ्रष्टाचार आणि कागदपत्रांमध्ये बोगसगिरी होणार नाही. तसेच या कंपन्यांनी काही कागदपत्रे ही निविदा झाल्यानंतर देखील जोडल्याचे नाकारता येत नाही.

महालेखापाल, लोकलेखा समितीकडून व्हावी चौकशी – या संपूर्ण 1 हजार 33 कोटींच्या निविदा घोटाळ्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा हात असल्याची वाच्यता पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागातील मुख्य अभियंता यांच्या कार्यालयात सुरू आहे. सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महालेखापाल नागपूर, लोकलेखा समिती, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आणि मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाकडून चौकशी होण्याची गरज आहे.

राज्यसरकारने तात्काळ चौकशी करावी – जनतेच्या पै-पैशांचा उपयोग विकासकामांसाठी व्हावा हीच जनतेची अपेक्षा असते. मात्र याच जनतेच्या पैशांचा अपहार करून कोट्यावधी रूपये पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आणि त्यांच्याशी मिलीभगत असलेल्या कंपन्या आणि कंत्राटदारांवर पैशांची खैरात जनतेच्या पैशांतून सुरू आहे. तब्बल 1 हजार 33 कोटी रूपयांचा हा निविदा घोटाळ्याची राज्य सरकारने तात्काळ दखल घेवून चौकशी समिती नेमावी अन्यथा याप्रकरणी जनहित याचिका दाखल करून आम्ही न्यायालयात दाद मागू.

पुणे ब्राम्हण सेवा संघांकडून अनेक तक्रारी – पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराबद्दल ब्राम्हण पुणे संघांकडून अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. पुणे शहराचे ब्राम्हण महासंघाचे शहराध्यक्ष मंगेश पंचपोर यांनी देखील या निविदांचे गौडबंगाल काय? असा सवाल उपस्थित केला आहे.

हीच ती रस्त्यांची कामे आणि निविदा क्रमांकांसह
2) वाकुर्डे बिऊर सागांव मांगले रा. मा. 159
दि. 27-7-23 कि.मी. 0/0 ते 35/0 मध्ये मेंटेनन्स नि. क्र. 23/2 वर 46,63,931 रू.
दि. 09–23 कि.मी. 15/800 ते 23/0 मध्ये सुधारणा नि. क्र. 32// वर 4,11,91,000 रू.
दि. 09-8-23 कि. मी. 24/300 ते 28/0 मध्ये सुधारणा नि.क्र. 32/8 वर 4,29,61,000 रू.

4) खरसुंडी पारे अलाटे प्रजिमा 26
दि. 9-11-22 कि.मी. 13/0 ते 24/0 मध्ये सुधारणा नि. क्र. 49/2 वर 5,31,65,158 रू.
दि. 10-7-23 कि.मी. 12/0 ते 32/500 मध्ये सुधारणा नि. क्र. 16/3 वर 6,81,21,511 रू.
दि. 06-9-23 कि.मी. 21/0 ते 30/500 मध्ये सुधारणा नि. क्र. 45/4 वर 5,84,72,413 रू.
दि. 18-1-24 कि.मी. 12/0 ते 32/0 मध्ये सुधारणा नि. क्र. – 92/10 वर 5,17,28,000 रू.

8) वाळवा पडवाळवाडी बवाची पोखर्नी प्रजिमा 11
दि. 17-7-23 कि.मी. 0/0 ते 19/200 मध्ये मेंटेनन्स नि.क्र. 18/8 वर 26,38,000 रू.
दि. 21-11-23 कि.मी. 0/0 ते 1-/200 मध्ये सुधारणा नि.क्र. 61/1 वर 5,58,66,000 रू.

10) कळेठाण भवराचीवाडी वेजेगांव प्रजिमा 20
दि. 10-7-23 कि.मी. 10/0 ते 18/0 मध्ये सुधारणा नि.क्र. 16/2 वर 3,82,24,387 रू.
दि. 24-7-23 कि.मी. 0/0 ते 1-/0 मध्ये मेंटेनन्स नि.क्र. 25/6 वर 24,52,916 रू.
दि. 18-8-23 कि.मी. 10/0 ते 18/0 मध्ये सुधारणा नि.क्र. 37/2 वर 3,82,24,387 रू.
दि.05-1-24 कि.मी. 6/0 ते 13/0 मध्ये सुधारणा नि.क्र. 84/1 वर 7,25,03,734 रू.
दि. 18-1/24 कि.मी. 1/800 ते 15/0 मध्ये सुधारणा नि.क्र. 92/8 वर 5,25,25,000 रू.

11) गलवेवाउी अवळाई दिघांची प्रजिमा 55
दि. 14-11-22 कि.मी. 0/0 ते 12/0 मध्ये सुधारणा नि.क्र. 45/1 वर 1,13,96,014 रू.
दि. 14-7-23 कि.मी. 0/0 तेक 12/0 मध्ये सुधारणा नि.क्र. 19/5 वर 3,78,37,655 रू.

12) पिंपरी बु. काळेशोन जि. बार्डर प्रजिमा. 48
दि. 17-8-23 कि.मी. 0/0 ते 7/100 मध्ये सुधारणा नि.क्र. 30/6 वर 3,00,76,590 रू.
दि. 24-8-23 कि.मी. 3/500 ते 7/100 मध्ये सुधारणा नि.क्र. 36/1 वर 3,20,90,498 रू.

13) सिराळा फकिनवाडी मंगले प्रजिमा 7
दि. 21-7-23 कि.मी. 0/0 ते 14/200 मध्ये मेंटेनन्स नि.क्र. 24/4 वर 19,40,675 रू.
दि. 18-8-23 कि.मी. 10/0 ते 13/200 मध्ये सुधारणा नि.क्र. 34/5 वर 1,54,53,539 रू.
दि. 18-1-24 कि.मी. 0/0 ते 1/400 मध्ये सुधारणा नि.क्र. 92/1 वर 3,68,72,000 रू.

14) घोटी बीके पेड नरसेवाडी मोराळे प्रजिमा 30
दि. 24-7-23 कि.मी. लेंथ दिलेली नाही मध्ये मेंटेनन्स नि.क्र. 25/2 वर 28,79,916 रू.
दि. 18-8-23 कि.मी. 10/0 ते 18/0 मध्ये सुधारणा नि.क्र. 37/3 वर 4,69,87,000 रू.
दि. 21-8-23 कि.मी. 14/0 ते 17/600 मध्ये सुधारणा नि.क्र. 38/2 वर 4,39,27,826 रू.

COMMENTS