Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर हेळगाव चिंचणी रस्त्याच्या कामाला सुरुवात

मसूर / वार्ताहर : हेळगाव चिंचणी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन दोन महिन्यापूर्वी मोठ्या उत्साहात झाले होते. त्यानंतर सद्या या रस्त्याच्या कामाला प

सांगलीत महापूर काळात आपत्ती प्रतिसाद यंत्रणा
बेकायदेशीर सावकारी प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल
माण तालुक्यातील मागील पाणी टंचाईतील टँकरची बिले थकली

मसूर / वार्ताहर : हेळगाव चिंचणी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन दोन महिन्यापूर्वी मोठ्या उत्साहात झाले होते. त्यानंतर सद्या या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकासह प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याच्या समस्येमुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते. चिंचणीसह परिसरातील हेळगाव, बेलवाडी, कालगाव आदी ठिकाणच्या ग्रामस्थांमधून सद्या समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, इतरांचे जीवन समृध्द व्हावे, दुनियेच्या बळीराजाच्या शेतीला पाणी मिळावे यासाठी त्याग करून कण्हेर धरणग्रस्त म्हणून चिंचणी गाव मेढा तालुक्यातून कराड तालुक्यात कालगाव हेळगावच्या मध्यावर पुनर्वसित झाले आहे. सुमारे सन 1980 मध्ये या गावाचे पुनर्वसन झाले आहे. मात्र, पुनर्वसन झाल्यापासून अनेक समस्यांच्या गर्तेत असलेल्या येथील ग्रामस्थांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत होत्या. त्या ग्रामस्थांचे समस्यांचे ग्रहण सुटता सुटेना अशी अवस्था झाली आहे. या गावाला जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्था झाली होती. या रस्त्यात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. अनेक ठिकाणी हा रस्ता खचला होता. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करताना विद्यार्थ्यांसह वयोवृध्द ग्रामस्थांची मोठी कसरत होत होती. दुचाकी चारचाकी वाहनधारकही या खचलेल्या व खड्डेयुक्त रस्त्यामुळे त्रस्त झाले होते. हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी पुनर्वसित चिंचणी गावासह हेळगाव, कालगाव बेलवाडी आधी परिसरातील नागरिकांनी केली होती. याबाबत माजी सरकार मंत्री कराड उत्तरचे आ. बाळासाहेब पाटील यांनी पाठपुरावा करून या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामास आज सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांमधून व प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

COMMENTS