अखेर कचरा डेपोचे कुलूप पालिकेनेच तोडले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर कचरा डेपोचे कुलूप पालिकेनेच तोडले

शहरातील कचरा संकलन पुन्हा सुरू

अहमदनगर/प्रतिनिधी : बुरुडगावच्या ग्रामस्थांनी मनपाच्या कचरा डेपोला ठोकलेले कुलूप महापालिकेने गुरुवारी तोडले व कचरा गाड्या डेपोत नेऊन रिकाम्या केल्या.

माजी प्राचार्य कानवडे यांना आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान    
शालेय साहित्याचे वाटप
अतिक्रमणांवर पडतोय हातोडा… रस्त्यांचा श्‍वास होतोय मोकळा..

अहमदनगर/प्रतिनिधी : बुरुडगावच्या ग्रामस्थांनी मनपाच्या कचरा डेपोला ठोकलेले कुलूप महापालिकेने गुरुवारी तोडले व कचरा गाड्या डेपोत नेऊन रिकाम्या केल्या. याबाबत तक्रार करण्यासाठी नगर तालुका पोलिस ठाण्यात गेलो असता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. नगर तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी शुक्रवारी सकाळी या डेपोवर पाहणीसाठी येणार असून, त्यांनी तक्रार दाखल केली नाही तर पोलिस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे सरपंच बापू कुलट यांनी सांगितले. दरम्यान, मनपाद्वारे नगर ते बुरुडगाव रस्त्याच्या खडीकरणास सुरुवात झाली असून, पथदिव्यांचे कामही जवळपास पूर्ण होत आल्याचे सांगितले जाते. बुरुडगावला पाणीपुरवठा करावा, बुरुडगाव रस्त्याचे मजबुतीकरण करावे, या रस्त्यावर पथदिवे बसवावेत व दोन्ही बाजूंनी वृक्षारोपण करावे, या मागण्यांसाठी बुरुडगावच्या ग्रामस्थांनी त्यांच्या ग्रामपंचायत हद्दीत असलेला मनपाचा कचरा डेपो बंद करून टाकला होता. दोन दिवस हा डेपो बंद राहिल्याने नगर शहरात कचरा कोंडी झाली होती. कचरा भरलेल्या गाड्या रिकाम्या झाल्या नसल्याने मनपाने नव्याने कचरा संकलन बंद केले होते. या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी सकाळी 8 वाजता कचरा डेपोचे कुलूप दगड मारून तोडून दरवाजा उघडला गेला व हे काम महापालिकेनेच केले, असा दावा सरपंच कुलट यांनी केला. दरवाजा उघडून कचरा गाड्या आत नेल्या गेल्या व डेपोत कचरा टाकला गेला, असेही त्यांनी सांगितले. याबाबत नगर तालुका पोलिसांकडे तक्रार देण्यास गेलो असता त्यांनी तक्रार घेतली नाही व प्रत्यक्ष पाहणीसाठी शुक्रवारी सकाळी येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आज शुक्रवारी नगर तालुक्याचे पोलिस अधिकारी सानप येथे येणार असून, त्यानंतर त्यांनी तक्रार घेतली नाही तर पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेणार असल्याचेही सरपंच कुलट यांनी सांगितले. दरम्यान, नगर ते बुरुडगाव रस्त्याच्या खडीकरणाचे काम मनपाने सुरू केल्याचे सरपंच कुलट यांनी सांगितले. या रस्त्यावर पाच-सहा ठिकाणी खडीचे ढीग टाकले गेले आहेत. तसेच या रस्त्यावरील पथदिवे बसवण्याचे कामही सुरू करून ते पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. गावात सुरू असलेला टँकरद्वारे पाणीपुरवठा आम्ही बंद केला होता. मात्र, तो बंद करू नका व सुरूच ठेवा, असे मनपा आयुक्तांनी सांगितल्याने टँकरने पाणी येत आहे. पण आम्हाला स्वतंत्र पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याची आमची मागणी कायम आहे, असेही सरपंच कुलट यांनी सांगितले.

COMMENTS