Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर नसीम खान यांचा राजीनामा मागे

काँग्रेस हायकमांडची मनधरणी यशस्वी

मुंबई ः स्टार प्रचारक असलेले काँगे्रस नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी आपल्या प्रचारक पदाचा राजीनामा देत काँगे्रसवर गंभीर आरोप केले होते. अखेर

अकोले तालुक्यात वादळी वार्‍यांसह अवकाळीचा फटका
येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी
शिवसेना व भाजप आमने-सामने

मुंबई ः स्टार प्रचारक असलेले काँगे्रस नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी आपल्या प्रचारक पदाचा राजीनामा देत काँगे्रसवर गंभीर आरोप केले होते. अखेर या आरोपाची दखल काँगे्रस अध्यक्ष मल्लिकाजुर्न खरगे यांनी घेत नसीम खान यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर नसीम खान यांनी सोमवारी आपल्या प्रचार समितीचा राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला. तसेच ते यापुढे प्रचारामध्येही सक्रिय होणार आहेत.
नसीम खान हे महाराष्ट्र काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आमदार आणि कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले असून सध्या ते प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आहेत. ते लोकसभा निवडणुकांचे स्टार प्रचारकही होते. मात्र वर्षा गायकवाड यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत प्रचारक समिती पदाचा राजीनामा दिला होता. नसीम खान यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. पुण्यातील सभेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही त्यांची भेट घेत समजूत काढली होती. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला होता. अखेर पक्षश्रेष्ठींची ही मनधरणी यशस्वी झाली असून नसीम खान यांनी राजीनामा मागे घेण्याची घोषणा केली आहे. मी पक्षाचा निष्ठावन कार्यकर्ता आहे.पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी माझ्या पत्राचा विचार केला. त्यामुळे मी दिलेला राजीनामा मागे घेत आहे, अशी घोषणा करत माझ्यासोबत राज्यातील ज्या पदाधिकार्‍यांनी दिलेले राजीनामे मागे घ्यावेत.आजपासून आम्ही राज्यात धुव्वाधार प्रचार करु, वर्षा गायकवाड आमची लहान बहिण आहे. 2 लाखाच्या लिडने निवडून येतील, असा विश्‍वास देखील नसीम खान यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS