Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर महावितरणने घेतला संप मागे

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मध्यस्थी यशस्वी

मुंबई/पुणे ः राज्यात महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती महामंडळाच्या खाजगीकरणाविरोधात वीज वितरणच्या कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी संपाची हाक दिल्या

विरोधी पक्ष सत्तेसाठी हपापलेले – विठ्ठल पवार राजे
कॉपी करताना पकडल्यानंतर विद्यार्थिनीने केली आत्महत्या
केंद्र शासनाने महाराष्ट्राला प्रति महिना ३ कोटी लस देण्यासंदर्भातील ठराव विधिमंडळात संमत

मुंबई/पुणे ः राज्यात महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती महामंडळाच्या खाजगीकरणाविरोधात वीज वितरणच्या कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी संपाची हाक दिल्यानंतर पहिल्याच दिवशी अर्ध्या महाराष्ट्राची बत्तीगुल झाला होती. मात्र वीज वितरण कंपन्यांच्या शिष्टमंडळासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करत, राज्य सरकार महावितरणचे कोणतेही खासगीकरण करण्याचे आश्‍वासन दिले असून, राज्य सरकार आगामी तीन वर्षात या कंपन्यामध्ये 50 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली.

महावितरणच्या तिन्ही कंपनीच्या कर्मचार्‍यांनी त्यांच्या मागण्यांसाठी संप सुरू केला होता. तीन ते चार मुद्यांवर 32 संघटनांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. राज्य सरकारला महावितरण कंपन्यांचे कोणतेही खासगी करण करायची नाही. राज्य सरकार या तीनही कंपन्यांमध्ये 50 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करेल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. कंत्राटी कामगारांना नियमाने जो पगार मिळायला हवा, तेवढा मिळत नाही. त्यासाठी चांगली व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आमची बैठक यापूर्वी झाली असती तर आंदोलन करण्याची वेळीही आली नसती, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महावितरणच्या कर्मचार्‍यांनी संप पुकारल्यानंतर मुंबई उपनगर, पुणे, पिंपरी चिंचवडसह मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमधील ग्रामीण भागांमधील अनेक ठिकाणी वीजेचा पुरवठा खंडीत झाला आहे. तर काही ठिकाणी वीजेचा लपंडाव सुरू आहे. याशिवाय विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि भंडार्‍यातही अनेक वीज कर्मचार्‍यांनी रस्त्यावर उतरून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत महावितरणच्या खाजगीकरणाचा विरोध केला आहे. कर्मचारी कामावर हजर नसल्यामुळे विदर्भातील अनेक भागांमध्ये लाईट गेलेली आहे. त्यामुळे मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये चार्जिंग करायची तर कशी?, असा सवाल लोकांमध्ये उपस्थित होत आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि अहमदनगर या शहरांसह ग्रामीण भागातही वीज पुरवठा खंडीत झाला आहे. या जिल्ह्यांमध्येही हजारोंच्या संख्येने वीज कर्मचार्‍यांनी महावितरणच्या खाजगीकरणाचा विरोध करत आंदोलन केले आहे. याशिवाय शिंदे-फडणवीस सरकारविरोधात वीज कर्मचार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. वीज कर्मचार्‍यांनी तीन दिवसीय संप पुकारल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारनं इतर विभागातील कर्मचार्‍यांसह अभियंते आणि खाजगी एजन्सीच्या लोकांना तात्पुरत्या स्वरुपात कामाला लावले होते. मात्र ही यंत्रणा देखील कोलमडून पडली होती.

‘गो बॅक अदानी’च्या घोषणा – राज्यात वीज वितरण कर्मचारी आपल्या संपावर ठाम असून, विविध जिल्ह्यात महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यातील रास्ता पेठेतील महावितरण कार्यालयाबाहेर हजारो वीज कर्मचारी एकत्रित येऊन आंदोलन केले. यावेळी ‘गो बॅक अदानी’च्या कर्मचार्‍यांनी घोषणा देऊन राज्य सरकारचा निषेध नोंदविला. तर या आंदोलनामुळे पुणे शहरातील अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाल्याने त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसल्याचे पाहावयास मिळत आहे.

संपामुळे निम्म्या महाराष्ट्रात झाली होती बत्तीगुल – महावितरणने संपाची हाक दिल्यानंतर बुधवारी सकाळपासूनच निम्म्या महाराष्ट्रात बत्तीगुल झाल्याचे पहायला मिळाले. महावितरणने जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष सुरु करत, काही नंबर देखील उपलब्ध करून दिले होते. मात्र कर्मचार्‍याअभावी महावितरण आपल्या ग्राहकंना कोणताच दिलासा देऊ शकलेली नाही. संपकाळात वीज पुरवठा खंडीत होऊ नये, यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर काम सुरू असून तरीदेखील मुंबईच्या उपनगरांच्या भागात आणि पु्ण्यातील पिंपरी-चिंचवडसह विविध शहरात आणि जिल्ह्यात सकाळपासून वीज पुरवठा खंडीत झाला होता. महानगरात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक उद्योगधंदे आणि कंपन्यांचे उत्पादन देखील रखडले होते. मात्र याचा सर्वाधिक फटका हा लघुउद्योजकांना बसला आहे.

COMMENTS