Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर बच्चू कडू यांनी सोडला मंत्रिपदावरचा दावा

अमरावती ः अजित पवार यांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती

शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यास सरकारला वेळ नाही : छत्रपती संभाजीराजे यांची सडकून टीका
तरुणांनी राजकारणात येण्याची हिच खरी वेळ – विनोदसिंग परदेशी
दिव्यांगांच्या वेदना दूर करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा

अमरावती ः अजित पवार यांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी मंत्रिपदासाठी दावा सोडणार असल्याचे सांगितले होते. पण मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर त्यांनी आपला निर्णय तात्पुरता मागे घेत 18 जुलै रोजी ठाम भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी बच्चू कडू यांनी मंत्रिपदाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली.
बच्चू कडू यांनी मंत्रिपदासाठीचा दावा सोडला असल्याचे आज जाहीरपणे सांगितले. मंत्रिपदासाठी चर्चे असलेले बच्चू कडू यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सध्या 40-50 आमदार आहेत आणि मंत्रिपद कमी आहेत. यामध्ये सर्वांनाच मंत्रिपद पाहिजे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची अडचण कमी व्हावी यासाठी मी मंत्रीपदाचा दावा सोडतो. मुख्यमंत्री अडचणीत आहेत. मंत्रिपदासाठी ओढाताण सुरू आहे. मला मंत्रालय दिले, त्यामुळे मी मंत्रिपदाचा दावा सोडला अशी भूमिका कडू यांनी स्पष्ट केली.

COMMENTS