मुंबई/प्रतिनिधी ः भाजपचे नेते आणि मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी मासे खाल तर तुमचे डोळे हे अभिनेत्री ऐश्वर्या राय प्रमाणे होतील. ती मासे खाते
मुंबई/प्रतिनिधी ः भाजपचे नेते आणि मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी मासे खाल तर तुमचे डोळे हे अभिनेत्री ऐश्वर्या राय प्रमाणे होतील. ती मासे खाते म्हणून तिचे डोळे सुंदर आहेत असे भर कार्यकर्मात वक्तव्य केले. त्यांनतर त्यांच्यावर भाजपसह इतर पक्षातील महिला नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. तर त्यानंतर आपल्या या वक्तव्यावरून त्यांनी यु टर्न घेत ऐश्वर्या आपल्या मुलीप्रमाणे असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता राज्य महिला आयोगाकडून गावित यांच्या त्या वक्तव्याची गंभीर दखल घेण्यात आली असून त्यांनी नोटीस पाठवली आहे. तर त्या नोटिसीवर तीन दिवसात खुलासा मागितला आहे.
दरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी गवितांनी केलेल्या वक्तव्यामुळे महिलांचा अपमान होतो. तर लोकप्रतिनिधीना कुठलेही उदाहरण देण्यासाठी महिलांची गरज का भासते? असा सवाल केला आहे. तर महिलांबद्दल अपशब्द बोलणार्या लोकप्रतिनिधीवर यापुढे कडक कारवाई केली जाणार असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. मासे खाल्ल्याने माणूस म्हणजे बाईमाणूस चिकणे दिसायला लागतात आणि डोळे तरतरीत दिसतात. कुणीही बघितलं तर पटवूनच घेणार. अभिनेत्री ऐश्वर्या राय हीदेखील रोज मासे खायची म्हणून तिचे डोळे सुंदर आहेत, असे अजब वक्तव्य आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. दरम्यान, या वक्तव्यानंतर राज्य महिला आयोगाने डॉ. गावित यांना नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे या वेळी व्यासपीठावर मंत्री गावित यांच्या कन्या खासदार डॉ. हीना गावित आणि डॉ. सुप्रिया गावित यादेखील उपस्थित होत्या. शिरपूर तालुक्यातील अंतुर्ली येथे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ नाशिक यांच्या सहकार्याने व आवलमाता मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेच्या वतीने मासेमारी बांधवांना साहित्य वाटप व नावनोंदणी विकास मेळावा सोमवारी झाला. या वेळी मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. मंत्री गावितांनी आपल्या भाषणात आपल्या शरीराला मासे किती महत्त्वाचे आहेत याचे महत्त्व पटवून देताना अभिनेत्री ऐश्वर्या रायचे उदाहरण दिले. मासे खाण्याचे दोन फायदे होतात. डोळे सुंदर दिसतात आणि त्वचा चांगली दिसते. ऐश्वर्या राय बंगळुरूजवळ समुद्रकिनारी असलेल्या शहरात रहायची. ती दररोज मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे सुंदर आहेत. तुम्हीही मासे खाल्ले तर तुमचे डोळेही तिच्यासारखे सुंदर होती, त्वचा सुधारेल. माशांच्या तेलामुळे डोळे आणि त्वचेला चांगला फायदा होतो, असे डॉ. गावित म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले की, एका सायंटिफिक रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, मासे खाल्ल्याने डोळ्याचे तेज वाढते. त्यात विशेषत: महिलांचा दाखला देण्यात आला आहे. मला महिलांचा अपमान करायचा नव्हता. मी वैद्यकीय शिक्षणाचा विद्यार्थी आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलेला आहे.
COMMENTS