मुंबई : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्

मुंबई : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या चार मतदारसंघात शुक्रवार दि. 26 एप्रिल 2024 पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. त्यासाठीची तयारी संबंधित चारही लोकसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा निवडणूक यंत्रणेने केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीची अधिसूचना 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या चार मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील सूचना फलक, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय येथील सूचना फलकावरही प्रदर्शित करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक यंत्रणेने दिली आहे. लोकसभेच्या या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास 26 एप्रिल 2024 पासून सुरुवात होईल. 3 मे 2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील. दिनांक 4 मे 2024 रोजी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी होईल. त्यानंतर 6 मे 2024 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असेल. दिनांक 20 मे 2024 रोजी मतदान होईल. तर जून 2024 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. 26-मुंबई उत्तर मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, सातवा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई येथे, 27- मुंबई उत्तर पश्चिमचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, नववा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई- 51, 28- मुंबई उत्तर पूर्वचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय फिरोजशहा नगर, सांस्कृतिक सभागृह, स्टेशन साइड कॉलनी, गोदरेज कॉलनी, विक्रोळी (पूर्व), मुंबई, 29- मुंबई उत्तर मध्यचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, पाचवा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई- 51 येथे असेल.
COMMENTS