बीड प्रतिनिधी - तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी , अव्वल कारकून श्रीनिवास मुळे व संबंधित वकील यांनी बनावट दस्तऐवज तयार करून तलावाच्या
बीड प्रतिनिधी – तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी , अव्वल कारकून श्रीनिवास मुळे व संबंधित वकील यांनी बनावट दस्तऐवज तयार करून तलावाच्या मावेजापोटी 1 कोटी 46 लाख ,35 हजार 776 रुपयांचा शासनाची दिशाभूल करत अपहार केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच बाबासाहेब रावसाहेब मेंगडे रा. मेंगडेवाडी पो. वाघिरा ता.पाटोदा.जि.बीड यांच्या गट क्रमांक 100 मधील अंदाजे दिड एकर जमिन गाव तलाव क्रमांक 5 संचिका क्रमांक एलएनक्यु/ एसआर/ 08 /2008 ल.पा. बीड) मध्ये गेली असताना संबधित ठेकेदार व भुसंपादन ल.पा.बीड आधिका-यांनी संगनमतानेच परस्पर मावेजा उचलून आर्थिक फसवणूक केली असून संबधित प्रकरणात जबाबदार तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी , अव्वल कारकून श्रीनिवास मुळे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येऊन मावेजा देण्यात यावा.यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली मेंगडे कुटुंबीयासह दि.10 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव, विभागीय आयुक्त यांना दिले आहे.
मौजे.मेंगडेवाडी तहत वाघिरा ता.पाटोदा जि.बीड येथील श्री.बाबासाहेब रावसाहेब मेंगडे यांच्या मालकीची गट क्रमांक 100 मधील जमीन शासनाने गाव तलाव क्रमांक 5 मेंगडेवाडी (लमानतळ)साठी संपादीत केली होती. संचिका क्रमांक एलएनक्यु/एसआर/08/2008 ल. पा. बीड) . उपजिल्हाधिकारी भुसंपादन ल.पा.बीड यांनी दि.28 मार्च 2008 रोजी तालुका निरीक्षक भुमी अभिलेख पाटोदा यांना सदरील संपादीत जमिनीची संयुक्त मोजणी करून अहवाल कळवण्याबाबत आदेशित केले होते.सदर आदेशानंतर उप अभियंता ल.पा.(स्था.स्तर) उपविभाग पाटोदा या कार्यालयाचे शाखा अभियंता व भुमि अभिलेख कार्यालयाचे मोजनीदार संयुक्त मोजणीसाठी जायमोक्यावर गेले असता चिखल असल्याने व सिमांकन खुणा नसल्याने मोजणी करता आली नाही तसा पंचनामा केलेला असुन त्यानंतर सदरील संपादीत जमिनीची अद्याप मोजणी झालेलीच नाही. त्यानंतर सन 2013 मध्ये भुसंपादन कार्यालयातील तत्कालीन शिपाई, लिपिक,व अव्वल कारकून यांच्याशी संगनमत करून एका शेतकरी व वकिलाने बनावट संयुक्त मोजणीचे दस्तऐवज तयार करून त्या गट क्रमांक 100 मधील रामहरी सखाराम आरगुडे,वाल्मिक श्रीहरी आरगुडे, अंकुश श्रीहरी आरगुडे,आ.पा.क.श्रीहरी आरगुडे,लहु नरहरी आरगुडे, पवन नरहरी आरगुडे, आ.पा.क.नरहरी सखाराम आरगुडे,शहादेव प्रभाकर जगदाळे,अजय महादेव जगदाळे, विजय महादेव जगदाळे यांचे 4 हेक्टर 56 आर क्षेत्र दाखविण्यात आले असून संबंधित सह्या व शिक्के सुद्धा बनावट आहेत.सदरील संयुक्त जमीन मोजणीनंतर कलम 4 व कलम 6 चे प्रसिद्धी प्रक्रीया पुढे झाल्यानंतर भुसंपादन कायदा 2013 नुसार कलम 23 चे 30 प्रमाणे अंतिम निवाडा तत्कालीन उपजिल्हाधिकारी भुसंपादन ल.पा.बीड चंद्रकांत सुर्यवंशी यांनी दि.23 जुलै 2017 रोजी रूपये 1कोटी 60 लाख 99हजार 356 रुचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी दि.16 जानेवारी 2018 रोजी पाठवण्यात आला.सदरील प्रस्ताव दि.11 जानेवारी 2019 रोजी विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे जिल्हाधिकारी बीड यांनी पाठवल्यानंतर उपजिल्हाधिकारी भुसंपादन ल.पा.यांचे कार्यालयातील अव्वल कारकून श्रीनिवास मुळे व तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी संबंधित शेतकरी श्रीहरी आरगुडे व वकील यांनी संगनमत करून पी.एल.ए.खात्यावरून खातेदाराचे संमतीपत्र घेऊन श्रीहरी सखाराम आरगुडे यांचे नावाने धनादेश रुपये 1 कोटी,46 लाख,35 हजार,776 गणराज नागरी सहकारी बँक शाखा जालना रोड बीड खाते क्रमांक 23/ 2011615 जमा करण्यात आला असून संबंधित शेतकरी श्रीहरी आरगुडे, भूसंपादन कार्यालयातील अव्वल कारकून श्रीनिवास मुळे, तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी व संबंधित वकील यांनी बनावट दस्तऐवज तयार करून मावेजाची रक्कम हडप केली आहे.त्याचबरोबर सदरील संचिका व सीसी फार्म उपजिल्हाधिकारी भुसंपादन ल.पा.बीड यांच्या कार्यालयातुन गायब केली आहे. बनावट दस्तऐवज तयार करून ल.पा.विभाग अंतर्गत तलावामध्ये आर्थिक गैरव्यवहार तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी व अव्वल कारकून श्रीनिवास मुळे यांनी आणखी 20 पेक्षा जास्त प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झालेला असुन सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
COMMENTS