Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातार्‍यातील जिल्हा कारागृहातील कैद्यांमध्ये हाणामारी

सातारा / प्रतिनिधी : जिल्हा कारागृहात असणार्‍या बराकीत किरकोळ कारणावरून दोन न्यायालयीन कैद्यांत हाणामारी झाली. या हाणामारीत एक कैदी जखमी झाला असू

अर्थसंकल्पातील विकासाची पंचसूत्री राज्याला प्रगतीपथावर नेईल : ना. मंत्री जयंत पाटील यांचा विश्‍वास
प्रोत्साहन अनुदान जमा करा; अन्यथा ठिय्या आंदोलन
प्लास्टिकचा कचरा उघड्यावर फेकणार्‍याविरोधात कारवाई करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा / प्रतिनिधी : जिल्हा कारागृहात असणार्‍या बराकीत किरकोळ कारणावरून दोन न्यायालयीन कैद्यांत हाणामारी झाली. या हाणामारीत एक कैदी जखमी झाला असून, याप्रकरणी विकास भीमराव बैले (रा. कुशी, ता. पाटण) या कैद्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुशी (ता. पाटण) येथील विकास बैले हा एका गुन्ह्यातील संशयित असून, त्याला न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा कारागृहातील सर्कल क्रमांक एकमधील एक क्रमांकाच्या बराकीत ठेवण्यात आले आहे.
याच बराकीत दुसर्‍या गुन्ह्यातील संशयित अक्षय दिनकर यादव यालाही कारागृह प्रशासनाने ठेवले होते. बराकीत असणार्‍या बैले आणि यादव यांच्यात नेहमी किरकोळ कारणावरून वाद व्हायचा. या वादातून चिडून बैले याने यादव याला मारहाण केली. मारहाणीत यादव याच्या तोंडास गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. हा प्रकार कारागृह व्यवस्थापनातील कर्मचार्‍यांना सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी बैले याने यादव याला दिली. तपासणीदरम्यान यादव हा जखमी असल्याचे कारागृहातील रक्षकांच्या निदर्शनास आले. चौकशीदरम्यान यादव याने किरकोळ कारणावरून बैले याने मारहाण केल्याचे सांगत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले. त्यानुसार कारागृह रक्षक सखाहरी शिंदे (रा. सातारा) यांनी याबाबतची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली. त्यानुसार बैले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक ए. ए. वाघमोडे अधिक तपास करत आहेत.

COMMENTS