कर्जत : शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यासाठी पहाटेपासून न थकता रस्त्यावर उतरून मेहनत करणाऱ्या कर्जत नगरपंचायतीच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने भावनिक व सन्माननीय कार्यक्रमात गौरव करण्यात आला. कर्जतमध्ये पार पडलेल्या या अनोख्या सन्मान सोहळ्यात या महिलांना “स्वच्छता दूत” असे सन्माननीय संबोधन देत माहेरची साडी प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. दररोज सकाळी कर्जत शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवर झाडून स्वच्छता करून शहर स्वच्छ ठेवण्याचे मोलाचे कार्य या महिला करत असतात. ऊन, पाऊस व थंडी अशा कोणत्याही परिस्थितीत न डगमगता शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या या महिलांच्या कार्याची दखल घेत रोटरी क्लबने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबविला. या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ कर्जतच्या महिला सदस्या पूनम चंद्रकांत राऊत, मोनाली ओंकार तोटे, कार्तिकी संदीप काळदाते, सोनाली विशाल मेहेत्रे, मंजुश्री नितीन तोरडमल, लताताई राजेंद्र जगताप, मंदा नितीन देशमुख, आर्शिन शहाबाज आतार, रेखा संतोष सुरवसे, संगीता विजयकुमार चव्हाण यांच्यासह रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे अध्यक्ष प्राचार्य चंद्रकांत राऊत, सेक्रेटरी शहाबाज आतार, डॉ. संदीप काळदाते, सदाशिव फरांडे, राजेंद्र जगताप, नितीन तोरडमल, सचिन धांडे, संदीप गदादे, जगदाळे, गणेश जेवरे, निलेश दिवटे आदी रोटरी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. संदीप काळदाते व प्राचार्य चंद्रकांत राऊत यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आर्शिन शहाबाज आतार यांनी मानले.
कर्जत : शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यासाठी पहाटेपासून न थकता रस्त्यावर उतरून मेहनत करणाऱ्या कर्जत नगरपंचायतीच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने भावनिक व सन्माननीय कार्यक्रमात गौरव करण्यात आला. कर्जतमध्ये पार पडलेल्या या अनोख्या सन्मान सोहळ्यात या महिलांना “स्वच्छता दूत” असे सन्माननीय संबोधन देत माहेरची साडी प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
दररोज सकाळी कर्जत शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवर झाडून स्वच्छता करून शहर स्वच्छ ठेवण्याचे मोलाचे कार्य या महिला करत असतात. ऊन, पाऊस व थंडी अशा कोणत्याही परिस्थितीत न डगमगता शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या या महिलांच्या कार्याची दखल घेत रोटरी क्लबने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबविला.
या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ कर्जतच्या महिला सदस्या पूनम चंद्रकांत राऊत, मोनाली ओंकार तोटे, कार्तिकी संदीप काळदाते, सोनाली विशाल मेहेत्रे, मंजुश्री नितीन तोरडमल, लताताई राजेंद्र जगताप, मंदा नितीन देशमुख, आर्शिन शहाबाज आतार, रेखा संतोष सुरवसे, संगीता विजयकुमार चव्हाण यांच्यासह रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे अध्यक्ष प्राचार्य चंद्रकांत राऊत, सेक्रेटरी शहाबाज आतार, डॉ. संदीप काळदाते, सदाशिव फरांडे, राजेंद्र जगताप, नितीन तोरडमल, सचिन धांडे, संदीप गदादे, जगदाळे, गणेश जेवरे, निलेश दिवटे आदी रोटरी सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ. संदीप काळदाते व प्राचार्य चंद्रकांत राऊत यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आर्शिन शहाबाज आतार यांनी मानले.

COMMENTS