Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत महिला डॉक्टरला बेदम मारहाण

नातेवाईकांनीही केली रुग्णालयात तोडफोड

मुंबई : कोलकात्यात महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असतांना मुंबईमध्ये एका महिला डॉक्टरला मद्यधुंद अ

मराठा आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या
परीक्षांचे दिवस असल्याने ध्वनी प्रदूषण थांबवा
कास्टिंग डायरेक्टर मयंक दीक्षितला बेदम मारहाण

मुंबई : कोलकात्यात महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असतांना मुंबईमध्ये एका महिला डॉक्टरला मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरूणाने बेदम मारहाण करत तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे. त्याच्या नातेवाईकांनी महिला डॉक्टर व तिच्या एका नर्सला मारहाण केली. ही घटना मुंबईतील सायन रुग्णालयात रविवारी सकाळी घडली. ही घटना पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली, यावेळी रात्रीच्या ड्युटीवर महिला डॉक्टर होती.
आरोप असलेल्या रुग्णाच्या चेहर्‍यावर जखमा झाल्या होत्या. यावर उपचार घेण्यासाठी तो व त्याचे काही नातेवाईक त्याला रुग्णालयात घेऊन आले होते. यावेळी महिला डॉक्टर त्याच्यावर उपचार करत असताना त्याने महिला डॉक्टर व अटेंडंटला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच महिला डॉक्टरला धमकावत त्याने मारहाण केली. तर त्याच्या सोबत असलेल्याणी देखील रुग्णालयात तोडफोड केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोकमान्य टिळक रुग्णालयात रविवारी पहाटे काही नागरिक एकाला घेऊन आले होते. जखणी तरुण हा दारूच्या नशेत होता. त्याच्या जखमेला टाके घालावे लागणार होते. तर या पूर्वीच त्याच्या जखमेला टाके घालण्यात आले होते. यावेळी त्याच्या जखमेत अडकलेला कापूस डॉक्टर काढत असतांना रुग्णाने डॉक्टरांशी वाद घालण्यास सुरूवात केली. यावेळी नेमके काय झाले आहे हे पाहण्यासाठी जखम मोकळी करावी लागते, असे डॉक्टरने सांगितले. मात्र, जखम पाहत असतांना रुग्णाला दुखल्याने त्याने महिला डॉक्टरला जोरदार ढकलले व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने दारू प्यायली असल्याचे पुढे आले. यानंतर त्याच्या नतेवकांनी देखील मोठा राडा घातला. त्यानंतर पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणी महिला डॉक्टरने सायन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायन रुग्णालयातील डॉक्टरांच्या संघटनेचे सदस्यही पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही, असे संघटनेच्या लोकांनी सांगितले.

COMMENTS