Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विकासकामांची अंमलबजावणीसाठी वृक्षतोड ः आयुक्त शेखर सिंह

पुणे : नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी आणि विकासकामांची अंमलबजावणी करण्यासाठी झाडांचे पुनर्रोपण किंवा वृक्षतोड करण्याशिवाय पर्याय नसतो, असे स

आगामी निवडणुकीत गद्दारी खपवून घेणार नाही : नारायण राणे (Video)
वाळवा महिला राष्ट्रवादीतर्फे केंद्र सरकारचा निषेध
जन्मदात्या बापाकडून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार | LOK News 24

पुणे : नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी आणि विकासकामांची अंमलबजावणी करण्यासाठी झाडांचे पुनर्रोपण किंवा वृक्षतोड करण्याशिवाय पर्याय नसतो, असे सांगत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी वृक्षतोडीचे समर्थन केले आहे. वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने ‘रानजाई महोत्सव’ व 27 वे भव्य ‘फळ-फुले भाजीपाला बागा प्रदर्शन’ व स्पर्धेचे आयोजन महापौर निवास निगडी प्राधिकरण येथील मोकळ्या मैदानात 1 ते 3 मार्च 2024 या कालावधीत करण्यात आले आहे. या महोत्सवाला भेट दिल्यानंतर आयुक्त सिंह बोलत होते.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, उल्हास जगताप, उपायुक्त रविकिरण घोडके यावेळी उपस्थित होते. पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाला अडथळा ठरणारी संरक्षण खात्याच्या जागेवरील 142 झाडे तोडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलताना आयुक्त सिंह म्हणाले, देशातील सर्वात पर्यावरणपूरक शहरांमधील एक पिंपरी-चिंचवड शहर आहे. नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी आणि विकासकामांची अंमलबजावणी करण्यासाठी बर्‍याचवेळा झाडांचे पुनर्रोपण किंवा वृक्षतोड करण्याशिवाय पर्याय नसतो. वृक्षतोड केल्यानंतर पाचपट किंवा दहापट वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. महापालिका याची पूर्णपणे काळजी घेत आहे. शहरात विविध ठिकाणी हजारोंच्या प्रमाणात वृक्षारोपण केले जात असून त्यात प्रामुख्याने देशी झाडांची लागवड केली जात आहे. शहरातील वातावरण पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी तळवडे येथे महापालिकेच्या वतीने जैवविविधता उद्यानाची उभारणी करण्यात येणार आहे. 50 एकरमध्ये उभारण्यात येणार्‍या या पार्कमुळे शहराला एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. नागरिकांना पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असणार आहे.

COMMENTS