Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवघ्या चार तासांमध्ये नादुरूस्त रोहित्र बदलले; मांजरीतील वीजग्राहकांना दिलासा

पुणे : उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या वीजग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि. ९) रात्री १० च्या सुमारास न

महसूल मंडळ स्तरावर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान : महसूल मंत्री बावनकुळे
उदगीर येथे बसस्थानकात प्रवाशांचे प्रचंड हाल
पत्नीचा गळा चिरला, मग उकळते तेल टाकले; चारित्र्याच्या संशयावरून केली हत्या

पुणे : उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या वीजग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि. ९) रात्री १० च्या सुमारास नादुरुस्त झालेले ६३० केव्हीए क्षमतेचे वितरण रोहित्र अवघ्या चार तासांमध्ये बदलून पहाटेला वीजपुरवठा पूर्ववत केला. यामुळे मांजरी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

याबाबत माहिती अशी की, बंडगार्डन विभाग अंतर्गत मांजरीमधील झेड कॉर्नरच्या शेजारी चिंतामणी कॉलनी, शिवकृष्णा लॉन्स, मांजरी-मुंढवा मुख्य रस्ता या परिसराला वीजपुरवठा करणारे ६३० केव्हीए क्षमतेचे वितरण रोहित्र बुधवारी (दि. ९) रात्री १० च्या सुमारास बंद पडले. परिणामी सुमारे १४०० घरगुती व व्यावसायिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या अभियंता व जनमित्रांनी रोहित्राची पाहणी केली असता ते पूर्णतः नादुरुस्त झाल्याचे व बदलणे आवश्यक असल्याचे दिसून आले. दुसरीकडे रात्री भयंकर उकाडा असल्याने व पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध होऊ शकत नसल्याने नागरिक हैराण झाले होते. या संदर्भात अधीक्षक अभियंता (प्र.) श्री. रवींद्र बुंदेले यांनी तातडीने सूचना देत लगेचच रोहित्र बदलण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे रोहित्राची वाहतूक करण्यासाठी ट्रक व क्रेनची मध्यरात्रीच व्यवस्था करण्यात आली. मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी नवीन ६३० केव्हीए रोहित्र तातडीने उपलब्ध करून दिले. त्यानंतर रात्री १२ च्या सुमारास नादुरुस्त रोहित्र हटवून त्याठिकाणी नवीन रोहित्र लावण्याचे काम सुरु झाले व पहाटे ४ च्या सुमारास ते पूर्ण झाले. यानंतर ४.३० वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला. या कालावधीत नागरिकांनी देखील महावितरणला सहकार्य केले. अवघ्या चार तासांमध्ये वितरण रोहित्र बदलण्याची कामगिरी अतिरिक्त कार्यकारी अभियंता रामचंद्र लोंढे, सहायक अभियंता अभिजित सांगळे, जनमित्र किरण कुंभार, लालू जगवार, पंकज टेकम, शुभम बोरवली, राजू जाधव, विशाल माने, स्वराज तायडे यांनी केली. तर अतिरिक्त कार्यकारी अभियंता वैभव खटावकर, उपकार्यकारी अभियंता फुलचंद फड, गणेश शेळके, ओंकार कुलकर्णी यांनी सहकार्य केले.

COMMENTS