Homeताज्या बातम्यादेश

अयोध्येत भीषण रस्ता अपघात, ट्रक आणि बसच्या धडकेत चार जणांचा मृत्यू

गोरखपूर लखनौ हायवेवर अयोध्येत शुक्रवारी संध्याकाळी मोठा अपघात झाला. प्रवाशांनी भरलेल्या बसवर सिमेंट वाहून नेणारा ट्रक उलटला. यामुळे चार जणांचा मृ

केरळमध्ये भरधाव स्कूल बसची रिक्षाला धडक, चार महिलांसह 5 जणांचा मृत्यू
कब्बडीचे सामने पाहायला गेलेल्या तरुणांची गाडी उलटली !
भीषण अपघात ! 3 जण जागीच ठार

गोरखपूर लखनौ हायवेवर अयोध्येत शुक्रवारी संध्याकाळी मोठा अपघात झाला. प्रवाशांनी भरलेल्या बसवर सिमेंट वाहून नेणारा ट्रक उलटला. यामुळे चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. श्री राम हॉस्पिटललाही अलर्टवर ठेवण्यात आले आहे. बसमध्ये सुमारे 40 प्रवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना डझनभर रुग्णवाहिकांमधून रुग्णालयात नेण्यात येत आहे. जखमींना अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत, मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आलेले लोक लखनऊहून आंबेडकर नगरला बसने जात होते. मुख्यमंत्री योगी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो अशी कामना केली आहे. अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 10 जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह सर्व वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात येत आहे.

COMMENTS