Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’मनसे’ नेते संदीप देशपांडेंवर जीवघेणा हल्ला

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी साकळी जीवघेणा हल्ला करण्यात आला. मुंबईतील दादर परिसरातील श

स्लो मोबाईल सुपरफास्ट करायचाय ? या टिप्स फॉलो करा
BEED : बीड नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “तिरडी”आंदोलन ! (Video)
कधी वाटते बंदुक घेऊन सुसाट पळावे यांच्यामागे…;तहसीलदार देवरेंची ऑडिओ क्लिप राज्यभरात चर्चेत, हुंदके देत केलेल्या निवेदनाने समाजमन अस्वस्थ

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी साकळी जीवघेणा हल्ला करण्यात आला. मुंबईतील दादर परिसरातील शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकच्या वेळी ही घटना घडली. देशपांडे यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजकीय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा संशय आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर वॉक करत असताना 4 अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. क्रिकेट खेळण्याच्या स्टंम्पसने देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी चारही हल्लेखोरांनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला जातात याची आरोपींना कल्पना होती. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. संदीप देशपांडे यांना  उपचारासाठी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवाजी पार्क पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना मनसे नेते संदीप धुरी म्हणाले की, देशपांडेंवरील हल्ला हा पूर्वनियोजित कट होता. यात संदीप देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. संदीप देशपांडेंनी अनेक घोटाळे बाहेर काढले आहे. त्याचाच राग मनात धरुन हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हल्लेखोरांचा चेहरा लवकरच समोर येईल, असे देखील संतोष धुरी यांनी सांगितले.

हल्ल्यामागे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत ः मनसेचा आरोप
संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. देशपांडे यांच्यावरील हल्ल्यामागे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे व संजय राऊत यांचा हात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. पोलिसांनी या दोघांचीही चौकशी करावी अशी मागणी मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी केली आहे. संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यात संजय राऊत व आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा थेट आरोप अमेय खोपकर यांनी केला आहे.

COMMENTS